पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Lockdown मुळे यंदा जागतिक योग दिनानिमित्त ठेवली 'ही' खास थीम
PM Narendra Modi and Yoga: (Photo Credits: PTI/PixaBay)

दरवर्षी प्रमाणे यंदाही 21 जून ला संपूर्ण जगभरात जागतिक योगा दिवस(International Yoga Day 2020)  साजरा केला जाणार आहे. मात्र यंदा कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे या महत्वपूर्ण दिवसावर विरजण पडू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यंदा खास थीम ठेवली आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून जागतिक योगा दिन शांततामय आणि चैतन्यमय वातावरणात साजरा व्हावा यासाठी पंतप्रधानांनी 'घरी योगा आणि कुटूंबासह योगा' (Yoga at Home & Yoga With Family) ही थीम ठेवली आहे. ज्यामुळे नागरिकांनी 21 जून रोजी घरात राहून आपल्या कुटूंबासह योगा दिवस साजरा करा अशी घोषणा केली आहे.

यंदा संपूर्ण जगभरात 6वा जागतिक योगा दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास संदेश देत लॉकडाऊनचे पालन करत घरच्या घरी योगा दिवस साजरा करण्यास सांगितले आहे. International Yoga Day 2019: मनाला एकाग्र आणि बुद्धीला कुशाग्र करण्यास मदत करेल सूर्यनमस्कार, सांगतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Watch Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "गेल्या काही वर्षांपासून योगाची लोकप्रियता वाढत चालली हे पाहून खूप आनंद होत आहे. सर्वसामान्यपणे हा एक सार्वजनिक कार्यक्रम आहे. मात्र यंदा लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनी घरी राहून आपल्या कुटूंबासोबत जागतिक योगा दिन साजरा करायचा आहे."

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत योग दिन साजरा करण्याबाबत एक प्रस्ताव मांडला. 2015 साली तो मान्य करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी175 देशांच्या सहप्रतिनिधींच्या संमतीने योग दिन सेलिब्रेशनच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला होता.