Surya Namaskar (Photo Credits: Twitter)

सूर्य नमस्कार (Surya Namaskar)आपल्या शरीराचा संपूर्ण आणि संतुलित विकास करतो. आठ आसनांचा समावेश असलेला हा सूर्यनमस्कार आपल्या शरीराला सर्वांगाने निरोगी आणि तजेलदार ठेवतो. सूर्यनमस्कार हा मुख्यत: सूर्योदय आणि सूर्यास्तापूर्वी करणे गरजेचे आहे. हा सूर्यनमस्कार कसा करावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ऑनलाईन योग सिरिजच्या माध्यमातून सांगत आहे. येत्या 21 जूनला संपुर्ण जगात 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' (International Yoga Day) साजरा केला जाईल. त्याचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी ही ऑनलाईन योग सिरिज सुरु केली. चला तर मग पाहूया कसा करायचा सूर्यनमस्कार..

सूर्य नमस्कारा मुळे तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. तसेच मेटॅबॉलिजम (Metabolism)मध्ये सुधार आणतो. मधुमेह नियंत्रित करण्यात मदत करतो. तसेच वजन नियंत्रित करण्यासही मदत होतो. तसेच तुमच्या मांसपेशींना मजबूत बनवतो.

हर्निया आणि पेप्टीक अल्सर असलेल्यांनी सूर्यनमस्कार करु नये. तसेच सायटिका आणि स्पॉन्डिलायसीस असलेल्यांनीही सूर्यनमस्कार करु नये. महिलांनी मासिक पाळीवेळी आणि गर्भवती महिलांनी सूर्यनमस्कार करु नये असेही या व्हिडिओमध्ये सांगितले.

International Yoga Day 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला पवनमुक्तासनाचे महत्त्व आणि फायदे सांगणारा व्हिडिओ

सूर्यनमस्कार मनाला एकाग्र आणि बुद्धीला कुशाग्र करण्यासाठी मदत करतो. शरीरास खूपच लाभदायक असणारा हा सूर्यनमस्कार तुम्ही अवश्य करुन पाहा.