पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज ऑनलाईन योगा सिरीजमध्ये पवनमुक्तानसानचे धडे दिले आहेत. नवा व्हिडिओ शेअर करत त्यांनी पवनमुक्तासन कसे करावे, त्याचे फायदे आणि महत्त्व समजावून सांगितले आहे. 21 जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या योगदिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी योगासनांची ऑनलाईन सिरीज सुरु केली आहे. योगासनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी, हा त्यामागील उद्देश आहे. (तुम्ही हे आसन केले आहे का? असा प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले वज्रासनाचे धडे)
नरेंद्र मोदी यांचे ट्विट:
Sharing a video on the many benefits of Pawanmuktasana. #YogaDay2019 pic.twitter.com/Y4Ka8WWcl1
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2019
नरेंद्र मोदी शेअर करत असलेल्या योगा व्हिडिओजचा फायदा नक्कीच सामान्य नागरिकांना होईल. यामुळे योगासंबंधित जनजागृती होण्यास मदत होईल.