International Yoga Day 2019: तुम्ही हे आसन केले आहे का? असा प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले वज्रासनाचे धडे
Vajrasana (Photo Credits: Twitter)

शरीर स्वास्थ्यासाठी सर्वात उत्तम विद्या कोणती असेल तरी ती योगविद्या. या योगविद्येचा आपला दैनंदिन जीवनावर किती चांगला परिणाम होऊ शकतो हे लोकांना पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ऑनलाईन सिरीज सुरु केली आहे. या सिरीजचा आज नववा दिवस आहे. आज नरेंद्र मोदी यांनी या व्हिडियो च्या माध्यमातून वज्रासनाचे (Vajrasana) करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे सांगितले. वज्रासन हे रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि पचन संस्था नियंत्रित करण्यासाठी मदत करत असेही त्यांनी या व्हिडियोमध्ये सांगितले आहे.

योग हे मनाचे शास्त्र आहे. त्यामुळे योगसाधनेचा परिणाम केवळ शरीरावर न होता मनावर आणि भावनांवरही होतो. त्याचे महत्त्व नरेंद्र मोदी या ऑनलाईन सिरीजच्या माध्यमातून सांगत आहेत.

येत्या 21 जूनला संपुर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस (International Yoga Day) म्हणून साजरा केला जाईल. त्यामुळे मोदींची ही ऑनलाईन योगा सिरीज लोकांसाठी नक्कीच हितावह आहे असे म्हणता येईल.