PM Narendra Modi Yoga Video (Photo Credits: Twitter)

योग हे मनाचे शास्त्र आहे. त्यामुळे योगसाधनेचा परिणाम केवळ शरीरावर न होता मनावर आणि भावनांवरही होतो. याच योगसाधनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ऑनलाईन योग सिरीज सुरु केली आहे. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मोदी दररोज एक नवीन आसन कसे करायचे आणि त्याचे महत्त्व सांगत आहेत. जागतिक योग दिनाचं औचित्य साधत या व्हिडिओ सिरीजची संकल्पना पुढे आली आहे. 5 जून पासून सुरु केलेल्या या सिरीजमधील आज पाचव्या आसनाचा व्हिडिओ मोदींनी ट्विटरवर शेअर केला आहे. आजचे आसन आहे पादहस्तासन. (व्हिडिओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी समजावले अर्ध चक्रासनाचे महत्त्व आणि फायदे)

पहा व्हिडिओ:

मोदींच्या या योग व्हिडिओ सिरीजमधून योगसाधनेबद्दल जागृकता निर्माण होण्यास मदत होईल, अशी आशा आहे.