Literacy | Representational image (Photo Credits: pxhere)

International Literacy Day Importance: साक्षरता हा बदलत्या जीवनाचा मूळ पाया आहे. असे असतानाही जगभरामध्ये साक्षरतेचे प्रमाण आजही समाधानकारक नाही. त्यामुळेच जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला जातो. हा दिन 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) द्वारे 1966 मध्ये साक्षरतेच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि सार्वत्रिक साक्षरता प्राप्त करण्यासाठी अजूनही अस्तित्वात असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यासाठी या दिवसाची स्थापना करण्यात आली.

साक्षरता दिन साजरा करण्याची प्रमुख कारणे

साक्षरतेला चालना देणे: हा दिवस वैयक्तिक जीवनात आणि संपूर्ण समाजात साक्षरतेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव करुन देतो. जी भूमिका साक्षरता कौशल्ये आत्मसात आणि विकसित करण्याच्या महत्त्वावर भर देते.

जागरुकता वाढवणे: मानवाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनामध्ये अक्षरओळख नसल्याने येणाऱ्या अडथळ्यांबद्दल जागरूकता वाढवतो. जेणेकरुन नागरिकांना विविध कौशल्ये आत्मसात करता येतील. अडथळ्यांवर मात करता येतील आणि गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि भेदभाव यांपासून स्वत:ला दूर ठेवता येईल.

साक्षरतेच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दरवर्षी, UNESCO आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनासाठी एक विशिष्ट थीम निवडते. या थीम अनेकदा वर्तमान जागतिक आव्हाने आणि शिक्षण आणि साक्षरतेशी संबंधित प्राधान्यक्रम प्रतिबिंबित करतात. साक्षरता हे एक मूलभूत कौशल्य आहे. जे व्यक्तींना सक्षम बनवते, गरिबी कमी करण्यास मदत करते. वैयक्तिक आणि सामाजिक विकासात योगदान देते. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हे स्मरण करून देतो की साक्षरता केवळ वाचन आणि लेखन नाही तर जीवनभर शिक्षण आणि समाजात सहभागासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे देखील आहे. हे शाश्वत विकास साधण्यासाठी आणि जगभरातील लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक साधन म्हणून साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करते.