Ram Navami 2021 (File Image)

Ram Navami Wishes in Marathi: संस्कृतीप्रधान भारतामध्ये प्रत्येक महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे होतात. अशात चैत्र शुद्ध नवमीला प्रभू राम चंद्राचा जन्म झाला अशी मान्यता आहे व म्हणून हा दिवस देशभरात राम नवमी (Ram Navami 2021) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला. यंदा 21 एप्रिल 2021 रोजी राम नवमीचा सण साजरा होईल. प्रभू राम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले जातात. राजा दशरथ आणि राणी कौसल्येच्या पोटी श्री रामाचा जन्म झाला होता. साधारण दुपारी 12 देशभरात रामजन्माचा सोहळा साजरा केला जातो.

प्रभु श्रीराम एकवचनी, एकबाणी, एकपत्नी, गुणवान पुत्र, राजधर्मचारी, एक आदर्श पुत्र-पति-बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष  होते. हे सगळे गुण त्यांच्या अंगी असुनही त्यांच्या अंगी अहंकार नव्हता. म्हणूनच आजही लहान मुलांचे व्यक्तिमत्व घडवताना त्यांना रामाचे उदाहरण दिले जाते. त्यांना रामायणातील गोष्टी ऐकवल्या जातात. तर अशा या राम नवमीच्या दिवशी खास मराठी Images, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status, Messages, Wishes शेअर करून द्या प्रभू श्री राम जन्मदिनाच्या शुभेच्छा.

श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे,

एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरूषोत्तम,

अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…

श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ram Navami 2021

दशरथ नंदन राम, दया सागर राम,

रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम,

श्री राम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा!

Ram Navami 2021

प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.

तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू दे

राम नवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा

Ram Navami 2021

संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।

प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥

श्री राम नवमीच्या शुभेच्छा!

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी

गंधयुक्त तरिही वात उष्ण हे किती!

दोन प्रहरीं कां ग शिरीं सूर्य थांबला

राम जन्मला ग सखी राम जन्मला

जय श्री राम!

Ram Navami 2021

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन,

श्री राम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!

Ram Navami 2021

दरम्यान, चैत्र शुक्ल नवमीला ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे. त्यानंतर स्नान करून पूजेला बसावे. पूजेमध्ये तुळशीची पाने आणि फुले ठेवा. त्यानंतर चंदन, धूप आणि गंध इत्यादीने रामाच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करा. रामाच्या मुर्तिला हार आणि गाठी घातल्या जातात. त्यानंतर आरती होते व प्रसाद वाटला जातो. राम नवमीला प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो. मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा होताना प्रभु रामचंद्राच्या मुर्तीला पाळण्यात ठेवून पाळणा म्हटला जातो. मात्र सध्या देशावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने लोकांनी घरीच हा सण साजरा करण्याचे आवाहन केले गेले आहे.