
Happy Holi 2020 Marathi Wishes: हिंदू वर्षाची सांगता करणारा सण म्हणजेच होळी (Holi). यंदा 9 मार्च रोजी भारतभर हा होळीचा सण मोठ्या उत्साहाने पार पडणार आहे. वर्षभरात अनुभवलेल्या वाईट घटना, दुःख, संताप, मनातील किल्मिषे हे सारं काही होळीच्या अग्नीत जाळून टाकण्याची आणि तिथूनच पुढे येणाऱ्या नव्या वर्षाचे स्वागत करण्याची ही नामी संधी असते. त्यामुळे आपल्यासोबत आपल्याच जवळच्या व्यक्तींसाठी सुद्धा हा सण आनंद आणि सुख घेऊन यावा अशी तुमचीही इच्छा असेल. हा तुमचा विचार तुमच्या त्या आवडत्या आणि जलच्या व्यक्तींपर्यंत पोचवायचा असेल तर त्यासाठी त्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देणे हा सोप्पा मार्ग आहे. अलीकडच्या काळात, प्रत्यक्ष भेटून दिलेल्या शुभेच्छांच्या इतकेच डिजिटल शुभेच्छांना सुद्धा महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे, तुम्हाला सुद्धा जर का, Whatsapp Status, Facebook Images किंवा अन्य सोशल मीडिया मार्फत शुभेच्छा द्यायच्या असतील, तर हे काही अस्सल मराठमोळे Messages, Greetings, शुभेच्छापत्रे डाउनलोड करून तुम्ही शेअर करू शकता. Holi 2020 Date: जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त ते रंगपंचमी सेलिब्रेशनच्या तारखा.
महाराष्ट्रामध्ये होळीचा सण हा फाल्गुन (हुताशनी) पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. या दिवशी रात्री लाकडांची होळी रचून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी पेटवली जाते. या होळीत विघ्नांचा नाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते. या खास दिवशी आपले मित्र, नातेवाईक, कुटुंबातील मंडळी या साऱ्यांना तुम्ही Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करू शुभेच्छा देऊ शकता.
होळीच्या शुभेच्छा देणारे संदेश
ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

होळीच्या अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांति नांदो.
होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

फाल्गुन मासी आली होळी
खायला मिळणार पुरणाची पोळी
रात्री देऊ मनसोक्त आरोळी
राख लावूनी आपल्या कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे !
होळी च्या हार्दिक!

दरम्यान, होळीचा सण हा भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या रूपात साजरा केला जातो, महाराष्ट्रात कोकण प्रांतात या काळात शिमग्याचा जल्लोष पाहायला मिळतो तर मथुरा वृंदावन इथे होळीच्या 15 दिवस आधीपासून सेलिब्रेशन केले जाते.