Holi Festival 2020 Dates: महाराष्ट्रात होळीचा सण विविध प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. जसा निसर्ग या काळात सृष्टीमध्ये रंगाची उधळण करतो तशीच होळी सणाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातही आनंदाचा वर्षाव व्हावा यासाठी होळी, धुळवड, रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. मराठी कॅलेंडरनुसार मराठी वर्षाची सांगता फाल्गुन महिन्याने (Phalguna Month) होते. या महिन्यात भारतामध्ये मोठ्या उत्साहामध्ये होळी साजरी केली जाते. महाराष्ट्रासह देशात आणि आता जगभरात विविध स्वरूपात होळीचा सण साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यत विविध स्वरूपात होळी साजरी केली जाते. तर मग पहा यंदा होळी(Holi), धुलिवंदन (Dhulivandan) आणि रंगपंचमी (Rangapanchami)चा सण नेमका कोणकोणत्या दिवशी साजरा केला जाणार हे जाणून घ्या आणि त्यानुसार या सणाच्या सेलिब्रेशनचा प्लॅन बनवा. ग़्रेगेरियन कॅलेंडर नुसार यंदा होळी 9 मार्च दिवशी, धुलिवंदन 10 मार्च दिवशी तर रंगपंचमीचा सण 13 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. March 2020 Festival Calendar: होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा यंंदा मार्च महिन्यात कधी साजरा केला जाणार?
जाणून घ्या यंदाच्या होळी सणाचं संपूर्ण वेळापत्रक
होळी: महाराष्ट्रामध्ये होळीचा सण हा हुताशनी पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. या दिवशी रात्री लाकडांची होळी रचून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी पेटवली जाते. या होळीत विघ्नांचा नाश व्हावा अशी कामना केली जाते. यंदा 9 मार्च दिवशी होळीचा सण आहे. होलिका दहन सूर्यास्तानंतर केले जाते त्यामुळे 6.26 नंतर होळी पेटवली जाऊ शकते.
धुळवड: धुळवडीचा सण यंदा 10 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. धुळवडीला हुताशनी पौर्णिमेच्या रात्री पेटवलेल्या होळीच्या राखेतून हा सण साजरा केला जातो. मुंबई, पुणे सारख्या शहरात धुलिवंदनाचा दिवस हा सुट्टीचा असल्याने या दिवशी रंगांनीदेखील
रंगपंचमी: फाल्गुन पंचमी दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. यंदा हा सण 13 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. या दिवशी नैसर्गिक रंग, पाण्याने रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.
महाराष्ट्रात होळीचा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. यामध्ये कोकणात होळी 'शिमगा' म्हणून ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ब्रज होळीचा वेगळाचा थाट असतो. त्यामुळे वाराणसी आणि मथुरेमध्ये खास पाणी आणि फुलांची उधळण करून हा सण साजरा केला जातो. तर यामध्ये एकमेकांवर रंग टाकून होळी सेलिब्रेट करण्यासोबत महिला पुरूषांना लाठी किंवा कपड्यांपासून बनवलेल्या चाबूकाने एकमेकांना फटकवतात. मथुरा आणि वृंदावन मध्ये 15 दिवसांची होळी सेलिब्रेट केली जाते.