March 2020 Festival Calendar: होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा यंंदा मार्च महिन्यात कधी साजरा केला जाणार?
मार्च 2020 । File Photo

March 2020 Hindu Festivals List:  ग्रेगेरियन कॅलेंडरमधील तिसरा महिना म्हणजे मार्च महिन्याची सुरूवात थोड्याच दिवसात होणार आहे. सध्या हळूहळू वातावरणातील थंडावा कमी होत आहे आणि उष्णता वाढत आहे. यंदा होळीचा सण (Holi) मार्च महिन्यात आहे. त्यासोबतच धुळवड, रंगपंचमी, मराठी नववर्षाची सुरूवात म्हणजे गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाचंदेखील मराठी सह हिंदू बांधवांना मोठं आकर्षण आहे. मग नेमका या महिन्यात कोणता सण येणार आहे? हे जाणून घेऊन या महिन्याचं तुमचं सुट्ट्यांचं प्लॅनिंग करा. सध्या 10,12 वी बोर्डाच्या परीक्षा देखील आहे. त्यामुळे तुमच्या घरातही यंदा बोर्ड परीक्षेला सामोरी जाणारी मुलं असतील तर सण आणि परीक्षांचं गणित जुळवून या महिन्यात सुट्ट्या कशा आहेत? हे देखील नक्की जाणून घ्या. Shiv Jayanti Tithi Date 2020: यंदा शिवजयंती तिथीनुसार कधी साजरी केली जाणार?

 महाराष्ट्रामध्ये होळी आणि गुढीपाडव्याची शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर  10 मार्च दिवशी धुलिवंदनाचा दिवस हा मुंबई शहरामध्ये ड्राय डे आहे.  Dry Days In Mumbai 2020: मकरसंक्रांती , होळी, गणेशोत्सव, एकादशी धरून यंदा वर्षभरात 26 ड्राय डे; पहा महिन्यानुसार पूर्ण यादी

मार्च 2020 मधील प्रमुख सण आणि सुट्ट्यांची यादी

2 मार्च - होलाष्टक प्रारंभ

6 मार्च - आमलकी एकादशी

8 मार्च - जागतिक महिला दिन

9 मार्च - होळी

10 मार्च - धुलिवंदन

12 मार्च - संकष्ट चतुर्थी

12मार्च - शिवजयंती तिथीनुसार

13 मार्च - रंगपंचमी

20 मार्च - भागवत एकादशी

24 मार्च - संभाजी महाराज पुण्यतिथी

25 मार्च - गुढीपाडवा

26 मार्च - अक्कलकोट स्वामी प्रकट दिन

नक्की वाचा: Maharashtra Public Holiday 2020 List: महाराष्ट्र सरकारकडून 2020 मधील सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर

दरम्यान होळी नंतर वातावरणामध्ये उष्णता वाढायला सुरूवात होते. त्यामुळे आता हवामान होणार्‍या बदलांकडे लक्ष द्या. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सणांचा आनंद लुटा. हिंदू बांधवांसाठी महत्त्वाचा असणारा गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शोभा यात्रा काढून मराठी नववर्षाची सुरूवात केली जाते. तर मराठी साम्राज्याची स्थापना करणार्‍या शिवाजी महाराजांची हिंदू दिनदर्शिकेनुसार जयंती आणि मराठी साम्राज्य वाढवणार्‍या शंभू राजांची पुण्यतिथी देखील आहे.