2020 Calendar (Photo Credits: Pixabay)

नुकतीच महाराष्ट्र  सरकारकडून वर्ष 2020 मधील सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादी जाहीर झाली आहे. सुट्ट्यांच्या बाबतीत 2020 मध्ये एकून 24 सुट्ट्या मिळाल्या असून त्यापैकी गणतंत्र दिवस, पारसी नवे वर्ष, मोहरम आणि दसरा या सणाच्या सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. गेल्या वर्षी अनेक सुट्ट्या जोडून आल्याने सर्वांनी बाहेर जाण्याचे नियोजन केले होते. महत्वाचे म्हणजे बकरी ईद, स्वातंत्र दिवस, गणेश चतुर्थी आणि लक्ष्मी पूजनाच्या सुट्ट्या शनिवारी आल्या आहेत. मात्र, यावर्षी शुक्रवारच्या दिवशी 6 सुट्ट्या आल्याने सर्वांना शुक्रवार, शनिवार आणि रविवार, अशा 3 सुट्ट्या सलग मिळणार आहेत. याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. चला तर पाहूया कशी आहे 2020 ची सुट्ट्यांची दिनदर्शिका. Festival Calendar 2020: मकरसंक्रांत, गणेश चतुर्थी, दिवाळी हे सण नव्या वर्षात पहा कधी येणार?

2020 मधील सुट्ट्यांची यादी पुढील प्रमाणे-

 

1) छत्रपती शिवाजी महाराज जयती- 19 फेब्रुवारी 2020, बुधवार

2) महाशिवरात्री- 21 फेब्रुवारी 2020, शुक्रवार

3) होळी- 10 मार्च 2020, मंगळवारी

4) गुढीपाडवा- 25 मार्च 2020, बुधवार

5) राम नवमी- 2 एप्रिल 2020, गुरुवार

6) महावीर जयंती- 6 एप्रिल 2020, सोमवार

7) गुड फ्रायडे- 10 एप्रिल 2020, शुक्रवार

8) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती- 14 एप्रिल 2020, मंगळवारी

9) महाराष्ट्र दिन- 1 मे 2020, शुक्रवार

10) बुद्ध पौर्णिमा- 7 मे 2020, गुरुवार

11) रमजान ईद- 25 मे 2020, सोमवार

12) बकरी ईद- 1 ऑगस्ट 2020, शनिवारी

13) स्वातंत्र दिन- 15 ऑगस्ट 2020, शनिवारी

14) गणेश चतुर्थी- 22 ऑगस्ट 2020, शनिवारी

15) महात्मा गांधी जयंती- 2 ऑक्टोबर 2020, शुक्रवार

16) ईद-ए-मिलाद- 30 ऑक्टोबर 2020, शुक्रवार

17) लक्ष्मीपूजन- 14 नोव्हेंबर 2020, शनिवारी

18) दिवाळी (बालप्रतिपदा)- 16 नोव्हेंबर, सोमवार

19) गुरु नानक जयंती- 30 नोव्हेंबर, सोमवार

20) ख्रिसमस- 25 डिसेंबर 2020, शुक्रवारी

ट्वीट-

रविवारी आलेल्या सुट्ट्यांची यादी खालील प्रमाणे-

 

1) गणतंत्र दिवस- 26 जानेवारी 2020

2) पारसी नववर्ष- 16 ऑगस्ट 2020

3) मोहरम- 30 ऑगस्ट 2020

4) दसरा- 25 ऑक्टोबर 2020

येत्या काही दिवसांतच नव्या वर्षाला सुरुवात होणार असून वरील माहिती सुट्ट्यांचा आनंद वाढवणारी आहे. तसेच अगामी वर्षात सुट्ट्यांचे नियोजन करण्यासाठीही वरील माहिती उपयोगी ठरणार आहे.