Festival Calendar 2020: मकरसंक्रांत, गणेश चतुर्थी, दिवाळी हे सण नव्या वर्षात पहा कधी येणार?
Indian Festival List | Photo Credits: File Photo

येत्या अवघ्या 20 दिवसांमध्ये नववर्ष म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 2020 या नव्या वर्षाची सुरूवात होणार आहे. नववर्ष म्हटलं की अनेकजण पुढील वर्षभराचं नियोजन करतात. त्यामधील महत्त्वाचे दिवस, सण पाहून अनेकजण सुट्ट्यांचं प्लॅनिंग करतात. भारतीयांचं वर्षभराच गणित हे सण -उत्सवांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. मग पहा या नव्या वर्षामध्ये मकरसंक्रांती पासून गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, ख्रिस्मस हे महत्त्वाचे सण आणि त्याच्या सुट्ट्या कधी आहेत. हे जाणून घ्या. Maharashtra Public Holiday 2020 list: महाराष्ट्र सरकारकडून 2020 मधील सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर.

साल 2020 मध्ये मकरसंक्रांती ते ख्रिस्मस हे सण कधी येणार?

मकरसंक्रात - 14 जानेवारी (मंगळवार)

प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी (रविवार)

शिवाजी महाराज जयंती - 19 फेब्रुवारी (बुधवार)

महाशिवरात्र - 21 फेब्रुवारी (शुक्रवार)

होळी -9 मार्च (सोमवार)

गुढीपाडवा - 25 मार्च (बुधवार)

श्रीराम नवमी - 2 एप्रिल (गुरूवार)

हनुमान जयंती - 8 एप्रिल (बुधवार)

गुड फ्रायडे - 10 एप्रिल (शुक्रवार)

अक्षय्य तृतीया - 26 एप्रिल (रविवार)

महाराष्ट्र दिन - 1 मे (शुक्रवार)

बुद्ध पौर्णिमा - 7 मे (गुरूवार)

रमजान ईद - 25 मे (सोमवार)

वटपौर्णिमा - 5 जून (शुक्रवार)

आषाढी एकादशी - 1 जुलै (बुधवार)

गुरू पौर्णिमा - 5 जुलै (रविवार)

रक्षाबंधन - 3 ऑगस्ट (सोमवार)

पतेती/स्वातंत्र्यदिन - 15 ऑगस्ट (शनिवार)

भाद्रपद गणेश चतुर्थी - 22 ऑगस्ट (शनिवार)

अनंत चतुर्दशी - 1 सप्टेंबर (मंगळवार)

घटस्थापना- 17 ऑक्टोबर (शनिवार)

दसरा - 25 ऑक्टोबर (रविवार)

कोजागिरी पौर्णिमा/ईद ए मिलाद - 30 ऑक्टोबर

दिवाळी - 14 नोव्हेंबर (शनिवार)

ख्रिस्मस - 25 डिसेंबर (शुक्रवार)

नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी सध्या देशा-परदेशात मोठी तयारी सुरू आहे. यंदा 31 डिसेंबरला 2019 ला अलविदा म्हणत नववर्षाची सुरूवात करताना मागील कटू आठवणींना अलविदा म्हणत पुन्हा नव्याने सुरूवात करा.