Shivaji Maharaj Tithi based Jayanti : शिवाजी महाराज आणि त्यांच्या जन्मदिवसाचा वाद अनेक वर्षांचा आहे. महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा उत्सव 19 फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाते. मात्र ही शिवजयंती तारखेनुसार साजरी केली जाते. मात्र तिथीनुसार शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया दिवशी झाला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. त्यामुळे यंदा तिथीनुसार शिवजयंतीचा उत्सव 12 मार्च 2020 दिवशी साजरा केला जाणार आहे. शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात तयारी केली जाणार आहे. Shiv Jayanti 2020 Status: शिव जयंती उत्सवापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत हे Tik Tok Videos.
महाराष्ट्र सरकारने 2001 मध्ये फाल्गुन वद्य तृतीया, 1551 (शुक्रवार. 19 फेब्रुवारी 1630) ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख म्हणून स्वीकरली आहे. त्यामुळे त्या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर करून शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या व्यतिरिक्त संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 (वैशाख शुद्ध तृतीया) ही जन्मतारीख होती. त्यानुसार अनेक शिवभक्त शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी शिवजयंतीचा उत्सव साजरा करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक शिवभक्त मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून सेलिब्रेट करतात. परंतू वेगवेगळ्या दिनदर्शिकांमध्ये वेगवेगळी तारीख दाखवली जाते.
शिवाजी महाराजांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी विविध संस्था आणि सरकार कडून पुढे शिवजयंतीचा उत्सव सार्वजनिक आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याला सुरूवात झाली. या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामधून त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. तर साहसी कथा सांगून त्यांचे विचार रूजवण्याचे प्रयत्न केले जाते.