Ghatasthapana 2020 Shubh Muhurat Timing: शारदीय नवरात्री मध्ये यंदा घटस्थापना कशी कराल? जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्ताची वेळ
Ghatasthapana 2020

Navratri 2020: भारतामध्ये यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला (Sharadiya Navatri) 17 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. 17 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या नऊ रात्रींच्या जागरामध्ये दुर्गा मातेच्या (Durga Mata) विविध नऊ रूपांची पूजा केली जाणार आहे. दरम्यान भारतभर विविध प्रथा-परंपरांसह नवरात्र साजरी केली जाते. परंतू अश्विन महिन्यातील प्रतिपदेला घटस्थापना (Ghatasthapana) करून देवीचा जागर सुरू होतो. यंदा सार्वजनिक उत्सवावर, सेलिब्रेशनवर कोविड 19 च्या संकटामुळे निर्बंध आले आहेत. परंतू घरच्या घरी घट / कलश स्थापन करून तुम्ही नवरात्र 2020 साजरी करणार असाल तर जाणून घ्या या सणाच्या निमित्ताने घरामध्ये घटस्थापना कशी कराल? यंदाच्या घटस्थापनेचा मुहूर्त (Ghatasthapana Muhurat) काय आहे? घटस्थापनेचे पूजा विधी ((Ghatasthapana Puja Vidhi) आणि बरंच काही! Navratri 2020 Calendar: घटस्थापना, खंडे नवमी ते दसरा यंदा नवरात्री मध्ये कोणत्या दिवशी? जाणून घ्या त्याचे पुजा विधी, महत्त्व

सामान्यपणे अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रांरभ सुरू होतो. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवतांची स्थापना करून घटात धान्य रूजत घालत त्याची नऊ रात्री पुजा करण्याची प्रथा आहे. सार्वजनिक ठिकाणी नवरात्रीच्या उत्सवाला आरंभ करताना देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. घरगुती स्वरूपात मात्र घटस्थापना केली जाते. Navratri Colours 2020 Full Schedule: शारदीय नवरात्री नऊरंगांचं मराठी वेळापत्रक तारखेनुसार इथे पहा आणि मोफत डाऊनलोड करा PDF स्वरूपात!

घटस्थापना 2020 मुहूर्त, तिथी आणि तारीख

घटस्थापना 2020 यंदा ग्रेग्रेरियन कॅलेंडरनुसार, 17 ऑक्टोबर दिवशी होणार आहे. हा अश्निन शुक्ल प्रतिपदेचा दिवस आहे. द्रिक पंचांगनुसार, घटस्थापना यंदा चित्र नक्षत्राच्या मुहूर्तावर होईल. यामध्ये त्याची सुरूवात 16 ऑक्टोबरला 2.58PM पासून 17 ऑक्टोबरला 11.52 AM पर्यंत असेल. घटस्थापनेसाठी प्रतिपदेचा पहिला तृतीयांश दिवसाचा वेळ मंगलदायी आहे.

घटस्थापना कशी कराल? जाणून घ्या पुजा विधी

  • घटस्थापना करण्यापूर्वी ती ज्यावर केली जाणार आहे त्या चौरंग किंवा पाटा खाली रांगोळीने स्वस्तिक काढून हळद कुंकू घाला. नंतर त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा.
  • चौरंग/पाटावर लाल कापड पसरा.
  • टोपली किंवा पराती मध्ये माती घालून त्यात मिश्र धान्य पेरा. मधोमध कलश ठेवावा. कलशात हळद-कुंकू, सुपारी, अक्षता, दुर्वा, सव्वा रूपया घाला. कलशाला हळदी कुंकुवाच्या प्रत्येकी 5 बोटांनी सजवा. कलशामध्ये नागवेलीची किंवा पाच प्रकारच्या पाच विविध पानांच्या मध्ये नारळ ठेवून सजवा.
  • कलश परातीत किंवा टोपल्यात ठेवून ते चौरंगावर ठेवा.
  • मग कलाशाला अक्षता-गंध लावा.
  • नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी एक अशी फुलांची माळ वाढवत जा.
  • दर दिवशी सोयीनुसार सकाळ-संध्याकाळ आरती करून पूजा करा.
  • परातीत/ टोपल्यात पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा थोडे थोडे पाणी घाला. नऊ दिवसात त्याला अंकूर येऊन त्यांची चांगली वाढ होते. त्या वाढीनुसार आपल्या घराची भरभराट होते, असा समज आहे.
  • दशमीच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या सांगता दिवशी हे रूजवण महिलांमध्ये देऊन ते केसांमध्ये माळण्याची प्रथा आहे.

नवरात्रीमध्ये भाविक देवीचा जागर करण्यासाठी उपवास देखील करतात. काही जण घटस्थापानेपासून पुढील नऊ दिवस उपवास करतात. यामध्ये काहींचा निर्जळी उपवास असतो तर काही जण केवळ घट उठता बसता म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदा आणि अष्टमी, नवमी दिवशी उपवास करतात आणि दसर्‍याच्या दिवशी हे उपवास सोडले जातात.