Navratri 2020 Dates| File Photo

Shardiya Navratri  2020 Dates and Tithi: भारतामध्ये अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नऊ रात्रींचा जागर हा नवरात्रोत्सव म्हणून साजरा केला जातो. यंदा ही नवरात्र 17 ऑक्टोबर 2020 दिवशी घटस्थापना (Ghatasthapana)  करून केली जाणार आहे. तर 25 ऑक्टोबर दिवशी दसरा (Dussehra) सणाच्या दिवशी त्याची सांगता होईल.दरम्यान देशभरात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. ओळखला जातो. त्यामुळे कुलाचारानुसार प्रत्येक ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी असू शकते पण हा सण आदिशक्तीच्या पुजनाचा आहे. दुर्गा मातेच्या नऊ रूपांची नऊ दिवशी पूजा केली जाते. Navratri 2020: नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते? जाणून त्याचं महत्त्व आणि खास मंत्र!

नवरात्री सणाचे महत्त्व

आदिशक्ती म्हणजे निर्मिती शक्तीची पूजा करण्याचा सण आहे. निर्मिती आणि नऊ या संख्येचे अतूट नाते आहे. जमिनीत पेरलेले बी नऊ दिवसांनी अंकुरते . गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने, नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. अंकगणितामध्येही नऊ ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे. नऊ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हणून देखील ओळखलं जातं. निर्मितीशक्ती हीच आदिशक्ती असल्याने नवरात्रीमध्ये नऊ रात्री नवदुर्गांचं पूजन करण्याची प्रथा आहे. घटस्थापनेपासून नऊ दिवस पूजा करून दररोज एक याप्रमाणे नऊ माळा बांधल्या जातात आणि दहाव्या किंवा दसर्‍याच्या दिवशी त्याचं उद्यापन केले जातं. (नवरात्री नऊ रंग 2020 मध्ये घटस्थापना ते दसरा दरम्यान पहा यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग?)

नवरात्रोत्सव 2020 तारखा आणि तिथी

  1. नवरात्रीचा पहिला दिवस - 17 ऑक्टोबर - प्रतिपदा
  2. नवरात्रीचा दुसरा दिवस - 18 ऑक्टोबर - द्वितिया
  3. नवरात्रीचा तिसरा दिवस - 19 ऑक्टोबर - तृतीया
  4. नवरात्रीचा चौथा दिवस - 20 ऑक्टोबर - चतुर्थी
  5. नवरात्रीचा पाचवा दिवस - 21 ऑक्टोबर - पंचमी
  6. नवरात्रीचा सहावा दिवस - 22 ऑक्टोबर - षष्ठी
  7. नवरात्रीचा सातवा दिवस -23 ऑक्टोबर - सप्तमी
  8. नवरात्रीचा आठवा दिवस -24 ऑक्टोबर - अष्टमी
  9. नवरात्रीचा नववा दिवस - 25 ऑक्टोबर - नवमी

नवरात्रोत्सवामध्ये विशिष्ट तिथींमध्ये वेगवेगळे सण देखील साजरे करण्याची प्रथा आहे. यामध्ये ललिता पंचमी यंदा 21 ऑक्टोबर दिवशी असेल. अष्टमीला होम हवन असण्याची प्रथा आहे. तसेच नवरात्रीतील अष्टमीला कन्यापूजन देखील केले जाते. नवमी हा खंडे नवमी म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी लढाऊ जाती विधिपूर्वक शस्त्रपूजन करतात.

महाराष्ट्रामध्ये महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशातीन देवतांची स्थापना करून पुजा केली जाते. दरम्यान ही देवीची तीन रूपं असून दृष्ट राक्षसांना मारण्यासाठी देवीने ही रूपं धारण केली असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीचा जागर करताना विविधं रूपांची पुजा करण्याची प्रथा आहे.