
अनंत चतुर्दशीने (Anant Chaturdashi) गणेशोत्सवाची सांगता केली जाते. यंदा अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर दिवशी आहे. या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन (Ganesh Visarjan) केले जाते. बाप्पाला निरोप देताना या दिवशी भव्य मिरवणूका निघतात पण यंदा कोविड च्या पार्श्वभूमीवर त्याला बंदी आहे. त्यामुळेच अत्यंत साधेपणाने बाप्पाला निरोप देण्याचं आवाहन राज्य सरकार कडून करण्यात आलं आहे. पण विधिवत आणि घरच्या घरीच तुम्ही बाप्पाची मूर्ती विसर्जित करणार असाल तर पहा यंदा अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जनाचा मुहूर्त (Anant Chaturdashi 2021 Visarjan Muhurat) काय आहे?
भाद्रपद शुक्ल चतुर्दशी हा दिवस अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. यंदा 19 सप्टेंबरला पहाटे 5 वाजून 59 मिनिटांनी चतुर्दशी सुरू होत आहे तर 20 सप्टेंबरला पहाटे 5 वाजून 28 मिनिटांपर्यंत ती आहे. नक्की वाचा: Ganesh Visarjan at Home: गणपती विसर्जन कसे करतात? जाणून घ्या उत्तर पूजा विधी ते व्हर्च्युअल गणेश विसर्जनाचे प्लॅन्स!
अनंत चतुर्दशी 2021 विसर्जन मुहूर्त
काही जण दहा दिवस गणरायाची सेवा करून अनंत चतुर्दशीला विशिष्ट मुहूर्तावर बाप्पाचं विसर्जन करतात. मग यंदा अनंत चतुर्दशीला पहा दिवसभरातील अनंत चतुर्दशीची शुभ वेळ काय?
सकाळच्या वेळा - 7 वाजून 58 मिनिटं ते दुपारी 12 वाजून 32 मिनिटं
संध्याकाळची वेळ - 6 वाजून 37 मिनिटं ते रात्री 11 वाजून 3 मिनिटं
रात्रीची वेळ - 20 सप्टेंबरच्या रात्री 2 वाजून 1 मिनिटं ते 3 वाजून 30 मिनिटं
पहाटेची वेळ - 20 सप्टेंबरच्या पहाटे 4 वाजून 58 मिनिटं ते 6 वाजून 27 मिनिटं
10 दिवस विराजमान बाप्पाच्या मूर्तीतील ज्येष्ठ व्यक्ती विसर्जनापूर्वी मंत्रोच्चाराने गणेश चतुर्थी दिवशी केलेली प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातील केलेलं देवत्त्व काढून घेतात. निरोपाची एकत्र आरती म्हणून बाप्पाला विसर्जनाला नेले जाते. विसर्जनाची मूर्ती 3 वेळेस पाण्यात भिजवून नंतर पूर्ण मूर्ती बुडवा. गणेश विसर्जनानंतर पाटाची पुन्हा आरती करून नैवेद्य, प्रसादाचे वाटप करून श्रीगणेशाला अखेरचा निरोप द्या. बाप्पाला निरोप देताना दही-भाताचा नैवेद्य शिदोरी म्हणून सोबत देण्याची प्रथा आहे.