File Image | Dr BR Ambedkar (Photo Credits: Wikipedia Commons)

Dr. BR Ambedkar Jayanti 2019: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb  Ambedkar) यांचा जन्मदिवस राज्यासह देशभरात आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या महान कार्याला सलाम आणि या थोर युगपुरुषाचे विचार पुढील पीढीपर्यंत पोहचवण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज त्यांची 128 वी जयंती. या जयंतीनिमित्त लहान मुलांना आंबेडकरांची ओळख करुन देण्यासाठी, त्यांची महती कळण्यासाठी या काही खास गोष्टी तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करु शकता...

# डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एका महार गरीब कुटुंबात 14 एप्रिल 1891 साली झाला. सुरुवातीला त्यांनी समाजातील दलित बांधवांसाठी चळवळ सुरु केली. त्यानंतर त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठीही लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, WhatsApp Status आणि शुभेच्छापत्रं!

# 1907 साली ते मॅट्रीकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि अशाप्रकारे कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे महार समाजातील ते पहिले विद्यार्थी होते. आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री होते.

# 29 ऑगस्ट 1947 साली आंबेडकरांना संविधानाच्या कमिटीचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले. संविधान कमिटीने त्यांना भारताचे नवीन संविधान लिहिण्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळे ते भारतीय संविधानाचे शिल्पकार ठरले.

# आंबेडकरांना बाबासाहेब असे संबोधले जाते. आदरणीय वडीलधारी व्यक्ती या अर्थाने त्यांना बाबासाहेब असे म्हटले जाते.

# आंबेडकरांचे मुळ आडनाव सकपाळ होते. पण त्यांच्या वडीलांनी त्यांचे शाळेत नाव अंबडवेकर असे घातले. त्यांच्या मूळ गाव अंबडवे यावरून हे नाव ठेवण्यात आले होते. मात्र बाबासाहेबांचे शिक्षक कृष्णा केशव आंबेडकर यांनी त्यांचे नाव बदलून आंबेडकर असे ठेवले.

# 14 ऑक्टोबर 1956 साली आंबेडकरांनी आपल्या काही दलित बांधवांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

# जर्नादन सदाशिव रणपिसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती 14 एप्रिल 1928 मध्ये पुण्यात साजरी केली. तेव्हा पासून आंबेडकरांची जयंती साजरी करण्याची प्रथा सुरु झाली. ‘आंबेडकर जयंती’ चं सेलिब्रेशन 1928 पासून सुरू झालं; कोणी आणि कशी सुरू केली भीम जयंती?

# मनाचा विकास हा मानवी अस्तित्वाचा अंतिम हेतू असावा, असे त्यांनी सांगितले. (नक्की वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार)

# 1990 साली त्यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन, कार्य, विचार पुढील पीढीसाठी प्रेरणादायी ठरेल.