Dr. BR Ambedkar Jayanti 2019 Wishes: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची 14 एप्रिल रोजी 128 वी जयंती. महाराष्ट्रासह भारतात आंबेडकरांचा जन्मदिवस एका उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. सदाशिव रणपिसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती 14 एप्रिल 1928 मध्ये पुण्यात साजरी केली. तेव्हा पासून आंबेडकरांची जयंती साजरी करण्याची प्रथा सुरु झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या गावी झाला. त्याकाळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार कुटुंबात त्यांचा जन्म झाल्यामुळे जातिभेद, अस्पृश्यता या गोष्टी साहजिकच त्यांच्या वाट्याला आल्या. मात्र आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि कर्तबगारीच्या जोरावर अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. त्यासाठी चळवळ सुरु करुन 1924 साली त्यांनी बहिष्कृत हितकारिणी या संस्थेची स्थापना केली. तरुणांना त्यांनी शिक्षणाचे, स्वावलंबनाचे, स्वच्छतेचे धडे दिले. (भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही गोष्टी)
समाजातील जातिभेद, अस्पृश्यतेबद्दल सातत्याने लढा देणाऱ्या या महामानवाला बौद्ध धर्माचे आकर्षण वाटू लागले आणि 14 ऑक्टोबर 1956 साली त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशा या महामानवाच्या जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, व्हॉट्सअॅप स्टेट्स आणि शुभेच्छापत्रं....
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
निळ्या रक्ताची धमक बघ,
स्वाभिमानाची आग आहे..
घाबरू नकोस कुणाच्या बापाला,
तु भीमाचा वाघ आहेस…
डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
मला तो धर्म आवडतो
जो स्वातंत्र्य, समता व बंधुता शिकवतो
डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
प्रत्येकाला समान समजणारे
बाबा साहेब हे महान होते
प्रत्येकाला स्वतंत्रपणे आणि सुखाने जगण्यास शिकवले
त्यांनीच स्वातंत्र्य आणि समानतेचा नारा दिला.
डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
व्हिडिओज:
या थोर युगपुरुषाच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी आणि त्यांच्या महान कार्याला सलाम म्हणून 14 एप्रिलला 'आंबेडकर जयंती' अगदी उत्साहात साजरी केली जाते. यास 'भीम जयंती' असेही संबोधतात. तसंच बाबासाहेबांना 'समतेचे' आणि 'ज्ञानाचे' प्रतिक मानले गेल्याने हा दिवस 'समता दिन', 'ज्ञान दिन' म्हणूनही साजरा केला जातो.