Ambedkar Jayanti 2019: ‘आंबेडकर जयंती’ चं सेलिब्रेशन 1928 पासून सुरू झालं; कोणी आणि कशी सुरू केली भीम जयंती?
Ambedkar Jayanti (Photo Credits: Wikipedia Commons)

Bhim Jayanti 2019:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची  यंदा 128 वी जयंती साजरी केली जात आहे. ‘भीम जयंती’(Bhim Jayanti) म्हणून  14 एप्रिल हा  दिवस महराष्ट्, बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मगाव मध्य प्रदेशातील महू यासोबतच देशा-परदेशात मोठ्या उत्साहात  साजरा केला जातो. आंबेडकर अनुयायी या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला,  त्यांच्या स्मृतीला वंदन करुन आदरांजली अर्पण करतात. आंबेडकर जयंती (Ambedkar Jaynti) सुरू करण्याची प्रथा पुण्यात 1928 साली जनार्दन रणपिसे (Janardan Ranpise) या सामाजिक कार्यकर्त्याने केली.  Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2019: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

कसा होता पहिल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सोहळा 

पहिली आंबेडकर जयंती 1928 साली जनार्दन सदाशिव रणपिसे या सामाजिक कार्यकत्याने केली. त्यावेळेस बाबासाहेबांच्या प्रतिमेची रथातून आणि उंटावरून मिरवणूक काढण्यात आली होती. यामुळे समाजात शोषित घटकांना अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची, एकत्र ये ऊन संघटीत होण्याची प्रेरणा मिळाली. हळूहळू  भीम जयंतीचा सोहळा गावातून सुरू होऊन शहरात आणि आज परदेशात पोहचला आहे. दबावाखाली राहणार्‍या अनेकांना यामुळे व्यवस्थेविरूद्ध आवाज उठवण्यास माध्यम मिळाले. महार सेवादलाची स्थापना जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी केली. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2019: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, WhatsApp Status आणि शुभेच्छापत्रं!

2017 सालपासून महाराष्ट्रामध्ये 14 एप्रिल हा दिवस  ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. नक्की पहा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितिक आदरांजली देणारी खास भीमगीतं

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार

आंबेडकर जयंती दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करून आंबेडकर अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  श्रद्धांजली अर्पण करतात. या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचदेखील आयोजन केले जाते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीला दिले जातात.