Lucknow ITBP Soldier Dead: लखनौच्या मोहनलालगंज परिसरात ITBP जवानाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह, पोलिसांकडून पुढील तपास सुरू
Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: ANI)

लखनौच्या (Lucknow) बाहेरील मोहनलालगंज (Mohanlalganj) येथील एका घरात 25 वर्षीय इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) जवानाचा रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळला आहे. बुधवारी रात्री उशिरा मृतदेह सापडला. जवानाचा (soldier) मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा पोलिसांना संशय असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. राजस्थानमधील (Rajastan) अलवर येथील मनोज यादव असे मृत व्यक्तीचे नाव असून सध्या कानपूरच्या (Kanpur) आयटीबीपीच्या 32 बटालियनमध्ये तैनात होते. दक्षिण विभागाचे अतिरिक्त डीसीपी, पूर्णेंदू सिंह म्हणाले की, तपासात उघड झाले की, मनोज न्यू कॉलनी परिसरात राहणाऱ्या अरुण यादवच्या जवळचा होता. मनोज मंगळवारी राजस्थानहून परतला पण कानपूरमध्ये ड्युटीवर रुजू होण्याऐवजी त्याने अरुणला भेटण्यासाठी मोहनलालगंजमध्ये मुक्काम केला.

अरुण मोहनलालगंज येथील एडीओ पंचायतीच्या कार्यालयात कंत्राटी नोकरीवर आहे.  बुधवारी मनोजने अरुणला सांगितले की, त्याला कर्जाच्या मंजुरीबाबत बँक अधिकाऱ्यांना भेटायचे आहे आणि ते निघून गेले. अरुण आपल्या कामाच्या ठिकाणी निघून गेला आणि त्याची पत्नी एका शेजाऱ्याच्या घरी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेली. दुपारी मनोज परत आला आणि घराला कुलूप असल्याचे दिसताच अरुणला फोन केला. हेही वाचा Greater Noida Murder Case: स्विगी डिलिव्हरी बॉयने नव्हेतर 'या' तिघांनी रेस्टॉरंट मालकाची केली हत्या, पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

दुपारी 2.30 च्या सुमारास मनोज घरी परतला आणि त्याला दरवाजे बंद दिसले. त्याने अरुणला सांगितले की तो जवळच्या एका घरात थांबला आहे. त्यानंतर काही वेळेनंतर अरुण घरी आला. अरुणला तो त्या घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. अशी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.