Coronavirus Update: भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 6 लाखांचा टप्पा; मागील 24 तासांत आढळले 19,148 नवे रुग्ण
Coronavirus Update (Photo Credit: Twitter)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून देशात कोरोना बाधितांच्या संख्येने 6 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासांत देशात 19,148 रुग्ण आढळले असून 434 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सद्य घडीला एकूण कोरोना बाधितांची संख्या 6,04,641 वर पोहोचली असून एकूण 17,834 रुग्ण दगावले आहेत. तसेच काल (1 जुलै) 11,881 नवे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,59,860 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे सांगण्यात येत आहे. देशात सद्य घडीला 2,26,947 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये आहेत. महाराष्ट्रात एकूण 1,80,298 रुग्ण आढळले असून 8053 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. Gilead ने निश्चित केली Remdesivir औषधाची किंमत; 5 दिवसांच्या कोर्ससाठी मोजावे लागतील तब्बल 1.75 लाख रुपये

भारतात 1 जुलैपर्यंत आलेल्या 90,56,173 कोविड-19 नमुन्यांपैकी काल 2,29,588 चाचण्या करण्यात आल्या अशी माहिती ICMR ने दिली आहे.

अशात अमेरिकेची कंपनी, गिलीड सायन्सेस इंक (Gilead Sciences Inc) यांनी एक दिलासादायक बातमी देत, रेमडेसीवीर (Remdesivir) नावाचे औषध बाजारात आणले आहे. या औषधाचा कोरोनाग्रस्त रुग्णांवर सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. आता कंपनीने रेमडेसीवीरचे दर निश्चित केले आहेत. अमेरिकन सरकार आणि इतर विकसित देशांसाठी, कोरोना व्हायरस ड्रग रेमडेसीवीरच्या एका कुपीसाठी 390 डॉलर्स दर आकारला जाईल. त्यानुसार, उपचारांसाठी 5 दिवसांच्या संपूर्ण कोर्सची एकूण किंमत $ 2,340 (सुमारे 1,75,500 रुपये) असेल.