धक्कादायक! उंची वाढत नाही या नैराश्येतून 22 वर्षीय ठेंगण्या विवाहितेची आत्महत्या; तीन महिन्यांत औषधांच्या तीन बाटल्या संपवल्या
Representational Image (Photo Credits: Pixabay)

लहान मुलेही माझ्यापेक्षा उंच आहेत... माझी उंची कधी वाढेल? माझे वय 22 वर्षे आहेत परंतु उंची अजूनही 3 फुट 9 इंच का? अनेकदा आफ्रीनच्या (Afreen Khatiq) मनात हे प्रश्न पडत राहिले. तीन महिन्यांत तिने आयुर्वेदिक पावडरच्या तीन बाटल्या घेतल्या, पण काहीही झाले नाही. अखेर एक दिवस सर्वकाही संपले, नैराश्येतून (Depression) आफ्रीनने आत्महत्या (Suicide) केली. उंची वाढत नाही या नैराश्येतून गुजरातमधील (Gujarat) एका कमी उंचीच्या मुलीने आत्महत्या केल्याची धाकादायक घटना घडली आहे.

आफ्रीन तिच्या लहान उंचीमुळे बऱ्याच दिवसांपासून नैराश्येत होती. सोमवारी ती सूरत येथील घरात पंख्याला लटकलेली आढळली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सचिन जीआयडीसी भागातील मगदूळनगर येथे ही घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने पती अन्वरला शौचालयातील क्लीनर खरेदीसाठी घराबाहेर पाठवले होते. अन्वर एक फोटो स्टुडिओ चालवतो. एक तासानंतर जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याने आफ्रीनला पंखाला लटकलेले पाहिले. अन्वर आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आफ्रीन तिच्या लहान उंचीमुळे नैराश्यात राहत होती. ती 3 फूट 9 इंच उंच होती, तर शौहर अन्वर 5 फूट 4 इंच उंच आहे. तीन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर जाहिरात पाहिल्यानंतर, उंची वाढविण्यासाठी आफ्रीनने एका लोकप्रिय ब्रँडची आयुर्वेदिक पावडर घेणे सुरू केले होते. (हेही वाचा: धक्कादायक! वजन कमी करण्यासाठी गोळ्या घेतल्याने ठाण्यात डान्सर युवतीचा मृत्यू; FDA ने सुरु केला तपास)

मात्र यामुळेही तिच्या उंचीत काही फरक पडला नाही व आफ्रीनची उदासीनता वाढतच गेली. याच कारणामुळे ती अनेकदा कौटुंबिक कार्यातही सहभागी होत नसे. सचिन जीआयडीसी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'तिच्या शेजार्यां नी आणि इतर ओळखीच्या लोकांनी, पती-पत्नीमध्ये कोणताही वाद नसल्याची पुष्टी केली. मात्र आफ्रीन तिच्या कमी उंचीला कंटाळली होती, ही गोष्ट चौकशीमधून बाहेर आली.' लाग्नाधीही तिने अनेक औषधे घेतली होती, मात्र काही फरक पडला नाही. या नैराश्येतून तिने शेवटी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला.