Advertisement
 
गुरुवार, जुलै 03, 2025
ताज्या बातम्या
8 hours ago

Maratha Reservation: मराठा समाजाने संयम बाळगावा, कोणीही निराश होऊ नये- अशोक चव्हाण; 10 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Bhakti Aghav | Sep 10, 2020 11:21 PM IST
A+
A-
10 Sep, 23:20 (IST)

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाने संयम बाळगण्याचे अवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अंतरिम असतो. त्यामुळे राज्य सरकार पुढील कारवाई कायदेशीर सल्ला घेऊन करणार आहे. त्यामुळे कोणीही निराश होऊ नये टोकाचे पाऊल उचलू नये असे अवाहनही अशोक चव्हाण यांनी या वेळी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायबाद्दल राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.

10 Sep, 23:07 (IST)

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आज पार पडली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, राज्याचे महाधिवक्ता, विधी विभागाचे सचिव आदी उपस्थित होते.

 

10 Sep, 22:56 (IST)

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव खटल्याचा लढा पाकिस्तानच्या न्यायालयात दाखल करण्यास परवानगी देण्याच्या भारताच्या मागणीसंदर्भातील, स्थानिक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा कोणताही पर्याय पाकिस्तानने फेटाळला आहे. पाकिस्तान मीडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

10 Sep, 22:36 (IST)

ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे निधन झाले आहे. त्यांनी रायगड जिल्ह्यातील माथेरान परिसरातील अनेक लोकांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला होता.

10 Sep, 22:12 (IST)

कर्नाटक: बेंगळुरू शहर पोलिसांचा मध्य विभागाने आज 1,350 किलो गांजा जप्त केला. हा गांजा पूर्वी कलबुर्गी जिल्ह्यातील कलगी येथील एका शेतात ठेवला होता. या प्रकरणी एकूण चार जणांना अटक केली आहे.

10 Sep, 21:44 (IST)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,371 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,63,115 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 1,367 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,28,112 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 26,632 इतक्या संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये 38 कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 8020 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

10 Sep, 21:32 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 1,916 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, आता पुणे शहरातील एकूण संख्या 1,13,832 इतकी झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 6,759 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 5,14,661 इतकी झाली आहे.

10 Sep, 21:05 (IST)

राज्यात आज 23,446 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 448 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 14,253 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नव्या वाढीमुळे  राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 9,90,795 वर पोहचला आहे. त्यापैकी 7,00,715 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 2,61,432 सक्रीय रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यातील मृतांचा आकडा 28,282 इतका झाला आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

10 Sep, 20:42 (IST)

जगात सुमारे 180 लसींचा विकास सुरु असून त्यापैकी 35 लसींच्या मानवी चाचणी सुरु आहेत असे जागतिक आरोग्य संघटनेचे डिरेक्टर जनरल Tedros Adhanom Ghebreyesus यांनी सांगितले आहे.

10 Sep, 20:04 (IST)

कंगना रनौत हिला सुरक्षा पुरवल्याबद्दल तिच्या आईने गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. कंगनाला सुरक्षा दिली नसती तर तिच्यासोबत काय झाले असते कोणालाही ठाऊक नाही अशा शब्दांत आशा रतौन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Load More

देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दरदिवशी देशात 90 हजारांच्या घरात नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात 89,706 नव्या रुग्णांची भर पडली. यात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश राज्यातील रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे.

याशिवाय राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी महाराष्ट्रात 23,816 कोरोनाव्हायरस संक्रमित आढळून आले. तसेच 13,906 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 325 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता 9,67,349 इतकी झाली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, आज भारतीय वायुसेनेमध्ये राफेल लढाऊ विमान दाखल होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज भारतीय हवाई दलात पाच राफल लढाऊ विमानांचा औपचारिकपणे समावेश करणार आहेत. पाच राफेल विमानांची पहिली खेप 27 जुलै रोजी फ्रान्सहून अंबाला येथील हवाई दलाच्या एअर बेसवर पोहोचली होती. भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल लढाऊ विमानांचा करार झाला आहे. या विमानांसाठी 59,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.


Show Full Article Share Now