ITR Filling: या वर्षी सर्व करदात्यांनी 31 जुलै 2023 पूर्वी त्यांचे विवरणपत्र भरायचे आहे. आतापर्यंत 2 कोटींहून अधिक लोकांनी आर्थिक वर्ष 2022-23 साठी रिटर्न भरले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, असे ठरवण्यात आले आहे की, ज्या व्यक्तीचे उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. काही श्रेणीतील लोकांना आयकर विभागाकडून रिटर्न भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. यासाठी काही अटी आणि नियमही आहेत. प्राप्तिकर कायदा, 1961 चे कलम 194P काही ज्येष्ठ नागरिकांना विवरणपत्र भरताना दिलासा देते. यासाठी त्यांना पात्रतेच्या अटींची पूर्तता करावी लागेल.
2022-23 या आर्थिक वर्षात म्हणजे 31 मार्च 2023 मध्ये ज्यांचे वय 75 वर्षे ओलांडले आहे असे कोणतेही ज्येष्ठ नागरिक या सर्वांना रिटर्न भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. या नागरिकांकडे निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त उत्पन्नाचे कोणतेही साधन नसावे. ज्या बँकेत पेन्शन येते त्याच बँकेतून या नागरिकांना व्याजाचे उत्पन्न मिळेल. (हेही वाचा -7th Pay Commission DA Hike: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या सुरुवातीलाचं मिळालं मोठं गिफ्ट; महागाई भत्ता झाला निश्चित)
केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, ज्येष्ठ नागरिकाला पेन्शन आणि त्याचे व्याज जिथून येते त्या बँकेत नागरिकांनी घोषणापत्र सादर करावे. त्यात नागरिकांची सर्व माहिती असावी. ज्येष्ठ नागरिकांचे दोन वर्ग आहेत. एक श्रेणी म्हणजे ज्यांना कर भरावा लागतो आणि दुसरा वर्ग असा आहे ज्यांना कर भरावा लागत नाही.
आयकर कायद्यानुसार करदात्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला आयटीआर भरावा लागतो. या रिटर्नमध्ये त्यांना मृत व्यक्तीच्या नावावर मिळालेल्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल. यासाठी कायदेशीर वारसदाराने आपले नाव कायदेशीररित्या नोंदवावे. कायदेशीर वारस रिटर्न भरण्यासोबत रिफंडसाठी अर्ज करू शकतात.