7th Pay Commission DA Hike: जुलै महिना सुरू होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. त्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) जाहीर झाला आहे. यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. आता हे निश्चित झाले आहे की जुलै 2023 पासून त्यांना 46 टक्के महागाई भत्ता (डीए वाढ) मिळेल. आचा कर्मचाऱ्यांच्या खिशात 42 नव्हे तर 46 टक्के दराने महागाई भत्ता (DA) येईल. वास्तविक, जुलै 2023 साठी DA स्कोअरमध्ये बंपर वाढ झाली आहे. मे महिन्याचा डीए स्कोअर जाहीर झाला आहे. यामध्ये मोठी झेप घेतली आहे. AICPI निर्देशांकानुसार 0.50 अंकांची वाढ झाली आहे. 7व्या वेतन आयोगानुसार जुलै 2023 मध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% ने वाढून तो 46% पर्यंत वाढेल याची पुष्टी झाली आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक (AICPI) च्या आधारे ठरवला जातो. हे आकडे दर महिन्याच्या शेवटी जाहीर केले जातात. या आधारे पुढील 6 महिन्यांत होणाऱ्या रिव्हिजनपर्यंत डीए स्कोअर किती झाला हे कळते. मे 2023 महिन्याचा निर्देशांक जाहीर झाला आहे. यामध्ये, CPI(IW) BY2001=100 मार्चमध्ये 134.2 च्या तुलनेत मे महिन्यात 134.7 वर होता. यामध्ये 0.50 अंकांची मोठी झेप घेतली आहे. (हेही वाचा- Small Savings Schemes Interest Rate: खुशखबर! केंद्र सरकारने अल्पबचत योजनांची व्याजदरात केला मोठा बदल; आता लहान बचत योजना धारकांना मिळणार अधिक व्याज)
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै 2023 मध्ये वाढणाऱ्या महागाई भत्त्याची संख्या आता निश्चित झाली आहे. डीएमध्ये 4 टक्के वाढ होईल, असा दावा तज्ज्ञांनी आधीच केला होता. पण, आता AICPI निर्देशांकाने हे स्पष्ट केले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, एकूण DA स्कोअर 45.58% वर पोहोचला आहे. मात्र, जूनचा आकडा येणे बाकी आहे. परंतु, आता महागाई भत्ता केवळ 4 टक्के दराने वाढणार असल्याची पुष्टी झाली आहे. कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता (DA) मिळेल.
7 व्या वेतन आयोगाअंतर्गत, कामगार ब्युरोने 5 महिन्यांसाठी AICPI निर्देशांक (औद्योगिक कामगार) ची संख्या जारी केली आहे. यापैकी जानेवारीत निर्देशांक मजबूत होता. फेब्रुवारीमध्ये थोडीशी घसरण झाली. पण, फेब्रुवारीमध्ये डीए स्कोअर वाढला होता. मार्चमध्ये पुन्हा एकदा निर्देशांकात चांगली उसळी आली. निर्देशांक 132.7 अंकांवरून 133.3 अंकांवर पोहोचला आहे. एप्रिलमध्येही मोठी उसळी दिसून आली आहे. निर्देशांकाची संख्या 134.02 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, डीए स्कोअर 45.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, मे महिन्याच्या संख्येने त्यात आणखीनच उत्साह वाढवला आहे. मे महिन्यात निर्देशांक 134.7 वर पोहोचला आहे. त्याच वेळी, डीए स्कोअर 45.58 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी जानेवारीत डीए 43.08 टक्के, फेब्रुवारीमध्ये 43.79 टक्के आणि मार्चमध्ये 44.46 टक्के आणि एप्रिलमध्ये 45.06 टक्के होता. आता जूनचे आकडे जुलैअखेर जाहीर होतील.