कामगार दिन 2019: संस्था रजिस्ट्रेशन किंवा नवीन संस्था कशी सुरु करावी? जाणून घ्या सर्व माहिती
institution-registration (File Photo)

International Workers' Day 2019: एक मे (1 May) हा दिवस म्हणजे कामगार दिन (Workers' Day). जगभरात हा दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात असेल. आपणही कदाचित कामगार किंवा कर्मचारी या वर्गात मोडत असाल. जगातील कोणताही कामगार घेतला तरी तो कोणत्या ना कोणत्या संस्था (Organization) अथवा कार्यालयातच (0ffice) काम करत असतो. अगदी त्याच्या कामाचे स्वरुप कार्यालयीन असले तरीसुद्धा. मग तो मजूर असो, कष्टकरी असो अथवा मातब्बल कंपनीचा अधिकारी. यात केवळ संघटीत कामगार (Worker In The Organized Sector) आणि असंघटीत कामगार (Unorganized Workers ) असाच भेद होऊ शकतो. तर, सांगण्याचे तात्पर्य असे की, आपण कामगार म्हणून काम करत असताना कधितरी आपल्या मनात विचार येतच असतो की, असे किती दिवस दुसऱ्यांच्या हाताखाली राबायचे? आपणच आपली स्वत:ची संस्था स्थापन केली तर? असा विचार मनात येताच दुसरा प्रश्न मनात तयार असतो संस्था रजिस्ट्रेशन (Organization Registration) किंवा नवीन संस्था (Institution Registration) कशी सुरु करावी? आपल्या मनातील प्रश्नाची अम्हास जाणीव असल्याने आम्ही इथे या प्रश्नांची उत्तरे देत आहोत. अर्थात, सरकारी नियम आणि कालपरत्वे या माहितीत थोडाफार बदल असू शकतो. त्यामुळे वाचकांनी ही माहिती वाचून प्रत्यक्ष सरकारी कार्यालयात जाऊन त्या आधारे प्रत्यक्ष विचारणा करणे इष्ट ठरते ठरते.

संस्था रजिस्ट्रेशन किंवा नवीन संस्था नोंदणी कुठे कराल?

कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा नागरिकांना सेवाभावी संस्था / मंडळ / शैक्षणिक मंडळ / ग्राम विकास मंडळ अथवा संस्था सुरु करावयाची असल्यास त्यासाठी जिल्हा पातळीवर सरकारी कार्यालय उपलब्ध असते. या कार्यालयास धर्मदायुक्त कार्यालय असे म्हणतात. कोणताही व्यक्ती, समूह अथवा नागरिकास संबंधित जिल्ह्यात असलेल्या धर्मदायुक्त कार्यालयात जाऊन आपल्या संस्थेची नोंदणी करता येते. नियमानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधीत संस्थेबाबत संस्थापकांना आवश्यक ते प्रमाणपत्र मिळते. कोणत्याही संस्थेच्या वैधतेसाठी हे प्रामाणपत्र आवश्यक ठरते. (हेही वाचा, International Labour Day 2019: आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचं महत्त्व काय? भारतामध्ये 1923 साली कसा साजरा करण्यात आला पहिला कामगार दिवस)

संस्था रजिस्ट्रेशन अथवा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

संस्था रजिस्ट्रेशन अथवा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
१. ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन ६. अनुसूची एक नियम ७,अनुसूची दोन नियम ८,अनुसूची सहा नियम १५.
२. नियम व नियमावलीची सत्य प्रत ७. समंतीपत्र व हमीपत्र
३. संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र ८. संस्था स्थापनेची ठराविक प्रत
४. सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र ९. प्रथम कार्यकारिणीची यादी
५. संस्थेच्या पत्त्याबाबत व मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र रु.१०० व कोर्ट फी स्टॅम्प ५ रु.सह. १०. संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.

११. सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा.

संस्था नोंदणीसाठी आवश्यक बाबी

नामोल्लेखाची पुनुरुक्ती टाळणे

कोणालाही नवी संस्था सुरु करत असताना काही बाबी ध्यानात ठेऊन त्याची पूर्तता धर्मदायुक्त कार्यालयाकडे करावी लागते. यात संस्थेच्या नावाची पुनरुक्ती टाळावी लागते. म्हणजेच जी संस्था सुरु करावयाची आहे तीचे नाव इतर संस्थेच्या नावाप्रमाणे नसावे.

ना हरकत प्रमाणपत्र

अनेकदा आपण पाहतो की, अनेक संस्था, कार्यालयांना काही गावे, व्यक्ती, महापुरुष अथवा समूहाचे नाव दिले जाते. अशा वेळी संबंधीत व्यक्ती, संस्था, त्यांचे वारस अथवा समूहातील अधिकृत संस्था आदिंचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. संबंधितांचे प्रमाणपत्र व नाव देण्यास समंती पत्र घेतले असेल तरच संबंधीत व्यक्ती, समूह अथवा समाजाचे नाव संस्थेला देता येते.

वयाची अट

संस्था स्थापन करणाऱ्या संस्थापकासोबत व्यवस्थापकीय मंडळही असते. संस्थापकासह या व्यवस्थापकीय मंडळातील सदस्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असायला हवीत.

व्यवस्थापकांची संख्या विषम असावी

जी संस्था स्थापन केली जाते त्या संस्थ्येच्या व्यवस्थापकांची संख्या ही नेहमी विषम असावी लागते. जसे की, ५, ७, ९, ११, १५ वैगेरे.

बँकेत बचत खाते आवश्यक

संस्थापक आणि संबंधीत संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाला परस्परांच्या संमतीने संस्थेच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते सुरु करणे आवश्यक असते. या खात्यावरुन जास्तीत जास्त (किंबहून पूर्णपणे) व्यवहार हे चेकद्वारेच करणे अपेक्षीत असते.

संस्थेचे ऑडीट

संस्था कोणत्याही प्रकारे कार्यरत असली तरी, संस्थेच्या कामगाजाचा आर्थिक ताळेबंद (ऑडीट) हे प्रतिवर्ष करावे लागते. असे करणे नियम आणि कायद्याने बंधनकारक असते. शासकीय योजना / नविन शाळा / प्रकल्प यात संस्थेला योगदान देण्यासाठी किंवा कामे घेण्यासाठी संस्थेचे किमान ३ ऑडित आवश्यक असतात.

अशा पद्धतीने तुम्ही आपल्याला हव्या त्या क्षेत्रात कोणतीही संस्था सुरु करु शकता. सरकारची ध्येय धोरणे आणि कायदे यात वेळोवेळी विविध पातळ्यांवर संशोधन सुरु असते. त्यासाठी अनेकदा नियम, कायदे अद्ययावत केलेले असतात. त्यामुळे वाचकांनी प्रत्यक्ष धर्मदायुक्त कार्यालयात जाऊनच आपल्याला आवश्यक ती माहिती घेणे आवश्यक आहे.