International Labour Day 2019. (Photo Credit: LatestLY/File)

International Workers' Day Significance: औद्योगिक क्रांती झाली कामगार, मजदूर यांना रोजगार मिळायला लागला. पण त्यासोबत त्यांची पिळवणूक होण्यास सुरूवात झाली. कामाच्या मोबदल्यामध्ये मजुरांना अधिक तास राबवले जात असे. याविरुद्ध जगभरात कामगार आणि कामगार संघटना एकत्र आल्या आणि मोठे आंदोलन उभे राहिले. कामगारांनी उठवलेल्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि प्रत्येक कामगाराने केवळ 8 तास काम करावे असा ठराव मंजूर करण्यात आला. ऑस्ट्रेलियापासून सुरू झालेली ही मोहिम पुढे अमेरिका, कॅनडापर्यंत पोहचली. 1891 सालपासून 1 मे हा दिवस कामगार दिन (Labour Day) म्हणून पाळला जातो. Happy Labour Day 2019: आंतरराष्ट्रीय कामगार दिना' च्या शुभेच्छा देण्यासाठी खास SMS, Wishes, Images, GIFs, WhatsApp Stickers आणि खास मराठी शुभेच्छापत्रं

भारतामध्ये कसा साजरा झाला पहिला आंतरराष्ट्रीय कामगार दिन

भारतामध्ये पहिला कामगार दिन मद्रास शहरामध्ये 'मद्रास उच्च न्यायालया'समोर 1 मे 1923 मध्ये साजरा करण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने भारतामध्ये पहिला कामगार दिन पाळला होता. पहिल्यांदा भारतात याच दिवशी 'लाल बावटा' वापरण्यात आला असं सांगण्यात येते. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांच्या नेतृत्त्वाखाली कामगार दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला सुरूवात झाली.

देशाच्या विकासात त्यांच्या कामगारांचे योगदान महत्त्वाचे असते. त्यामुळे जगभरात 1 मे दिवशी कामगारांच्या सन्मानार्थ या दिवशी सुट्टी जाहीर केली जाते. महाराष्ट्रामध्ये 1 मे दिवशी भाषावार प्रांतरचनेनुसार, गुजरातपासून महाराष्ट्र वेगळा झाला त्यामुळे महाराष्ट्रात 1 मे दिवशी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.