Labour Day Marathi Wishes: 1 मे हा दिवस महाराष्ट्रात केवळ महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) म्हणून नव्हे तर त्यासोबतीने जागतिक कामगार दिवस (International Workers Day) म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी कामगारांना त्याच्या मेहनतीला सलाम केला जातो. जगभरात 80 विविध देशांमध्ये जागतिक कामगार दिवस साजरा केला जातो. देशाच्या विकासामध्ये कामगारांचे योगदान अमुल्य असते, मग यंदाच्या कामगार दिनी त्यांच्या मेहनतीला सलाम करण्यासाठी व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status) , मेसेंजर (Messenger), WhatsApp Stickers यांच्या माध्यमातून मेसेज, ग्रिटिंग्स, Quotes,SMS, GIFs च्या माध्यमातून शेअर करा या शुभेच्छा! International Labour Day 2019: आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचं महत्त्व काय? भारतामध्ये 1923 साली कसा साजरा करण्यात आला पहिला कामगार दिवस
कामगार दिनाच्या शुभेच्छा
लक्ष्मीचे मंदिर समृद्धीने तेजाळले
कामगाराचे रक्त, घाम
पायाच्या कामी आले
घामाला मिळाला मानाचा मुजरा
1 मे करूया त्यासाठी साजरा
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जो मेहनतीने त्रासाला दूर करतो
रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो
तो प्रत्येकजण 'मजदूर' असतो
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू जिवंत ठेवतोस कामाचे आगार,
उभारतोस स्वप्नांचे मीनार,
कामगारा! तुझ्या कष्टाला सलाम
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शेतकरी ते कष्टकरी प्रत्येक कामगाराला
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा
GIF
शुभेच्छा व्हिडिओ:
WhatsApp Stickers च्या माध्यमातून तुम्हांला कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्लेस्टोअरवरून हा पॅक डाऊनलोड करावा लागेल. यानंतर व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या मदतीनेदेखीलतुम्हांला आंंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देता येतील.
1891 सालपासून 1 मे हा दिवस कामगार दिन (Labour Day) म्हणून पाळला जातो. कामगार, मजूरांची होणारी पिळवणूकीविरूद्ध जगभरात कामगरांनी चळवळ उभी केली होती.