COVID-19 Vaccination FAQs: लस निवडीचा पर्याय असतो का? ते स्मार्टफोन नसल्यास रजिस्ट्रेशन कसं करायचं? CoWIN Portal वर लसीच्या रजिस्ट्रेशन बाबत काही प्रश्नांची उत्तरं इथे घ्या जाणून
COVID-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये आता कोविड 19 संक्रमणाला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. 11 ते 14 एप्रिल दरम्यान लसीकरण मोहिमेमध्ये टीका उत्सव साजरा करण्यात आला आहे. यामध्ये 45 वर्षांवरील अधिकाधिक पात्र नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन केले आहे. आज टीका उत्सवच्या चौथ्या दिवशी देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात 11 कोटी पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सकाळी देण्यात आलेल्या माहितीमध्ये मागील 24 तासांत देशात 26 लाख लसीचे डोस देण्यात आल्याचं म्हटलं आहे. आता कोवॅक्सिन, कोविशिल्ड सोबत रशियाच्या स्फुटनिक V ला देखील परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. मग तुम्ही अद्याप लस घेतली नसेल तर तुम्हांला ही लस घेण्यासाठी कोविन अ‍ॅप किंवा आरोग्य सेतू अ‍ॅप वर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. पण यामध्ये तुम्हांला लस निवडीचा पर्याय मिळणार का? स्मार्टफोन नसेल तर कोविन वर रजिस्ट्रेशन होऊ शकतं का? असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर जाणून घ्या त्याची उत्तरं!

कोविन अ‍ॅप हे भारतामध्ये आरोग्य मंत्रालयाने खास कोविड 19 च्या लसीकरण रजिस्ट्रेशन साठी बनवलेले अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर तुमची माहिती, ओळखपत्र यांच्या मदतीने नजिकच्या व्हॅक्सिन सेंटर वर जाऊन लस घेण्यासाठी सोय आहे.

लसीकरणासाठी कुठे रजिस्ट्रेशन कराल?

www.cowin.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. “Register/Sign In Yourself” वर क्लिक करून विचारलेली माहिती भरा आणि लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करा कोविन पोर्ट्ल किंवा कोविन अ‍ॅप डाऊनलोड करून देखील तुम्ही स्वतःला लसीकरणासाठी रजिस्टर करू शकता. Covid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया?

कोविन पोर्टल वर एका मोबाईल नंबर वरून किती जणांचे रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते?

कोविन पोर्टल वर एका मोबाईल नंबर वरून 4 जणांसाठी रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते.

स्मार्टफोन नसलेले, संगणक नसलेले नागरिक कोविन वर रजिस्ट्रेशन कसे करू शकतील?

कोविन पोर्टल वर एका मोबाईल नंबर वरून 4 जणांसाठी रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या ओळखीत, नातेवाईक किंवा मित्राच्या फोनवरून तुम्ही तुमच्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. केवळ तुम्ही इतरांच्या मोबाईल नंबर वरून रजिस्ट्रेशन करत असाल तर त्याचा नंबर तुमच्या जवळ ठेवा. तो लसीकरण केंद्रावर माहितीची फेरतपासणी करण्यासाठी विचारला जाऊ शकतो. दरम्यान काही केंद्रांवर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन चा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्याकडे सोय नसल्यास थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करा.

कोविड 19 निवडीचा पर्याय आहे का?

कोविड 19 लसीकरणामध्ये कोवॅक्सिन, कोविशिल्ड आहे. पण कोणत्याही टप्प्यावर त्यामध्ये पर्याय निवडीचा मार्ग नाही. ज्या लसीचा पहिला डोस दिला जातो त्याचाच दुसरा डोस घेणं सुरक्षित आहे.

लसीचा दुसरा डोस वेगळ्या राज्यांत/ जिल्ह्यांत घेतला जाऊ शकतो का?

हो. नक्कीच लसीचा दुसरा डोस दुसर्‍या राज्यांत, जिल्ह्यांत जाऊन घेण्याची सोय आहे. मात्र केवळ तुम्हांला पहिला डोस ज्या लसीचा घेतला आहे तोच दुसरा डोस दुसर्‍या केंद्रावर घेताय ना? हे पहायचं आहे. COVID-19 Vaccination: कोविड 19 लसीकरणासाठी जवळचं केंद्र Google Maps च्या मदतीने कसं शोधाल पहा स्टेप बाय स्टेप.

लसीकरण केंद्रवर अपॉंईटमेंट घेऊनही जाऊ शकत नसल्यास ती रिशेड्युअल होते का?

हो! लसीकरण केंद्रवर अपॉंईटमेंट घेऊनही जाऊ शकत नसल्यास ती रिशेड्युअल करण्याचा पर्याय आहे. 'रिशेडुअल' चा पर्याय अ‍ॅप, पोर्टलवर आहे.

रजिस्ट्रेशन शुल्क किती?

रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. केवळ तुम्ही खजगी हॉस्पिटल किंवा लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणार असाल तर 250 रूपये प्रति डोस द्यावे लागतील. तर सरकारी हॉस्पिटल मध्ये ते मोफत असेल.

लसीकरणासाठी अपॉईंटमेट मिळाली हे कसं कळणार?

तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन यशस्वीपणे पूर्ण केले असेल तर तुम्हांला त्याचि तारीख, वेळ आणि लसीकरण केंद्राची माहिती असे सारे तपशील तुमच्या मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारा मिळतिल.

दरम्यान सध्या 45 वर्षावरील लोकांना सरसकट लस देण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये लसीकरणात कोविशिल्ड ही 45 दिवसांच्या फरकाने दिली जाते तर कोवॅक्सिन महिन्याभरात दुसरा डोस देऊन लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. कोविड 19 वायरस विरूद्ध लढण्यासाठी तुमच्या शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्याकरिता लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे.