COVID-19 Vaccination: कोविड 19 लसीकरणासाठी जवळचं केंद्र Google Maps च्या मदतीने कसं शोधाल पहा स्टेप बाय स्टेप
COVID-19 vaccine | Representational Image (Photo Credits: IANS)

भारतामध्ये अनेक राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला तडाखा बसत असताना आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण वेगवान करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आज 11 एप्रिल पासून 14 एप्रिल पर्यंत टीका महोत्सव साजरा करत लसीकरणाचा वेग वाढवण्याचं आवाहन केले आहे. सध्या देशात 45 वर्षांवरील नागरिकांचे सरसकट कोविड 19 लसीकरण सुरू केले आहे. या लसीकरणासाठी भारत सरकारने Co-WIN portal किंवा 'Aarogya Setu' app वर रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले आहे. Google India देखील Ministry of Health and Family Welfare ला मदत करत नजिकच्या कोविड 19 व्हॅक्सिनेशन सेंटरची माहिती देण्यास मदत करत आहे. काही दिवसांनी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील 1500 शहरातील 8600 पेक्षा अधिक सेंटर्स सध्या गूगलच्या मॅपवर (Google Maps) दाखवली जात आहेत. Covid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया?

गूगल मॅपच्या मदतीने तुमच्या नजिकचे व्हॅक्सिनेशन सेंटर कसं शोधाल?

  • Google search, maps आणि assistant यांच्या माध्यमातून तुम्ही नजिकचं कोविड 19 व्हॅक्सिनेशन सेंटर शोधू शकता.
  • "covid vaccine near me" असं तुम्हांला गूगल सर्च किंवा मॅपवर टाईप करायचं आहे.
  • 'where to get it' या डाव्या बाजुला असलेल्या टॅब मध्ये तुम्हांला तुमच्या विभगातील कोविड 19 व्हॅक्सिनेशन सेंटरची नावं, पत्ता, फोन नंबर दिसू शकेल.
  • यामध्ये तुम्हांला अपॉईंटमेंट गरजेची आहे का? काही विशिष्ट लोकांची मर्यादा आहे का? असे पर्याय देखील दिसू शकतील.

को विन अ‍ॅप वरून देखील व्हॅक्सिनेशन सेंटर नेमकं कुठे आहे? याची माहिती देण्यासाठी विशेष सेवा उपलब्ध आहे. MapMyIndia site वरून तुम्हांला त्याची माहिती मिळणार आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये लसीकरणाचा टप्पा 1 कोटीच्या पार गेला आहे. महाराष्ट्र राज्य देशात लसीकरणामध्ये अव्वल आहे. 'लसीकरण उत्सव’ म्हणजेच कोरोनाविरूध्दच्या दुसऱ्या मोठ्या लढाईचा प्रारंभ आहे असे देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.