7th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! या महिन्यात पगारवाढीची शक्यता
Money | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक खुशखबर आहे. सातवे वेतन आयोग (7th Pay Commission) लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून वाढीव पगार मिळणार आहे. रिपोर्टनुसार, केंद्र सरकार घरभाडे भत्ता (House Rent Allowance) दरात वाढ करणार आहे. यामुळे 7 व्या वेतन आयोग लागू असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार (Salary Hike) आहे. घरभाडे भत्ताच्या दरासोबतच महागाई भत्ता (Dearness Allowance) देखील 25 टक्क्यांनी वाढवला आहे.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून 28 टक्के केला आहे. हा नियम 1 जुलै पासून लागू करण्यात आला आहे. यापूर्वी X शहरामध्ये राहणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता 24 टक्के इतका होता. तर Y आणि Z शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता 16 आणि 8 टक्के इतका होता. मात्र महागाई भत्ता 25 टक्क्यांहून अधिक झाल्याने घरभाडे भत्त्यातही बदल करण्यात आले आहेत. (7th Pay Commission: पेन्शनधारकांसाठी खुशखबर! मोदी सरकारच्या 'या' नव्या आदेशामुळे मिळेल मोठा लाभ)

या नवीन बदलानुसार, X शहरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना 27 टक्के, Y शहरातील कर्मचाऱ्यांना 18 टक्के तर Z शहरातील कर्मचाऱ्यांना 9 टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे. DNA ने दिलेल्या रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाढीव घरभाडे भत्ता या महिन्याच्या पगारातून मिळणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनामध्येही वाढ झाली आहे.

दरम्यान, ज्या शहाराची लोकसंख्या 50 लाखांपेक्षा अधिक आहे, अशी X क्लास कॅटगरीत येतात. तर ज्या शहराची लोकसंख्या 5 लाखांपेक्षा अधिक आहे ते Y कॅटगरीत येतात. 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे Z कॅटगरीत येतात.