Money | Representational Image | (Photo Credits: PTI)

7TH CPC: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाशी (7th Pay Commission) संबंधित एक खुशखबर आहे. अर्थ मंत्रालयच्या व्यय विभागाने केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्तासह रोख पेमेंट (Payment) आणि ग्रॅच्युएटी (Gratuity) साठी आदेश जारी केले आहेत. रिपोर्टनुसार, जानेवारी 2020 पासून जून 2021 या कालावधीसाठी ग्रॅच्युएटी जारी करण्यात येईल. यासंदर्भातील निवेदन अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) जारी केले आहे. (7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार?)

1 जानेवारी 2020 आणि 30 जून 2021 दरम्यान सेवानिवृत्त होणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्यासाठी ग्रॅच्युईटी जारी करण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचे त्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, अर्थ मंत्रालय कार्यालयाने सेवानिवृत्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 7 सप्टेंबर 2021 रोजी ग्रॅच्युएटी आणि लीव्ह एन्कॅशमेंटशी संबंधित निवेदन जारी केले आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, कोविड -19 संकटामुळे अर्थ मंत्रालयाने 30 जून 2021 पर्यंत डीए आणि डीआर मधील वाढ स्थगित केली होती. जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीसाठी DA चा दर 17 टक्के राहील. मात्र, यावर्षी 1 जुलैपासून डीए वाढवून 28 टक्के करण्यात आला आहे. जे खालीलप्रमाणे आहे- जानेवारी 2020 ते जून 2020 साठी 4%, जुलै 2020 ते डिसेंबर 2020 साठी 3% आणि जानेवारी 2021 ते जून 2021 साठी 4%.

पहा ट्विट:

नवीन आदेशानुसार, 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2020 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी DA चा दर 21 टक्के (17% + 4%) मानला जाईल. 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी DA चा दर 24 टक्के (17% + 4% + 3%) आणि 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी DA चा दर आहे 28 टक्के असा मानले जाईल. त्यामुळे एकूणच पेन्शनधारकांना मोठा लाभ मिळण्याची खात्री आहे.