Mann Ki Baat: मन की बातच्या 94 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी देशाला संबोधित केले. सर्वप्रथम त्यांनी छठ सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पीएम मोदींनी किसान कुसुम योजनेचा उल्लेख केला. सौरऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रातील भारताच्या यशावरही त्यांनी भाष्य केले. मन की बात कार्यक्रमात पीएम मोदींनी गुजरातमधील मोढेरा गावाचे उदाहरण दिले. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, इस्रोने नवीनतम प्रक्षेपणांसह भारताला जागतिक व्यावसायिक बाजारपेठेत एक मजबूत खेळाडू बनवले आहे.
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचे कौतुक केले. एक काळ असा होता की भारताला क्रायोजेनिक तंत्रज्ञान नाकारण्यात आले होते. पण भारताने हे काम स्वतः केले आणि आज तो स्वतःच्या तंत्रज्ञानाने उपग्रह प्रक्षेपित करत आहे. (हेही वाचा -BYJU च्या कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामे; केरळनंतर आता कर्नाटकातही कर्मचाऱ्यांनी आरोप केले)
सौरऊर्जेमध्ये उत्तम काम -
पंतप्रधान मोदींनी सौरऊर्जेवरील भारताच्या यशाचीही गणना केली. पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण जग सौरऊर्जेकडे आपले भविष्य पाहत आहे. आम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी किसान कुसुम योजना सुरू केली. ज्या अंतर्गत शेतकरी सौर पंप बसवत आहेत. आता शेतकरीही सौरऊर्जेतून कमाई करत आहेत. तमिळनाडूतील कांचीपुरम येथील एका शेतकऱ्याचाही त्यांनी उल्लेख केला. ज्याने आपल्या शेतात दहा अश्वशक्तीचा सौर पंप संच बसवला आहे.
In solar energy, India has become one of the leading countries in the world. The way solar energy is transforming the lives of the poor & middle classes is a matter of study: PM Modi on 'Mann Ki Baat' radio show
(Source: DD News) pic.twitter.com/A0UCV7SI8P
— ANI (@ANI) October 30, 2022
मोढेरा गावाचे कौतुक -
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात गुजरातमधील मोढेरा गावाचाही उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, या गावातील जवळपास सर्व घरे त्यांच्या विजेची गरज भागवण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करत आहेत. तिथले लोक केवळ सौरऊर्जेद्वारे वीज वापरत नाहीत तर त्यातून कमाईही करत आहेत. पीएम पुढे म्हणाले की, मोढेरा गावापासून प्रेरित होऊन इतर गावातील लोकही मला त्यांच्या गावांचे सौर खेड्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी पत्र लिहित आहेत.