मुंबई: या वर्षीचा आयपीएल किताब जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाला ताब्यात घेण्याची तयारी सुरू झाली आहे. अहवालांनुसार, एका प्रमुख भारतीय व्यावसायिकाने मोठ्या रकमेला हा संघ विकत घेण्यासाठी तयारी दर्शवली आहे. हे तेच उद्योगपती आहे, ज्याच्या कंपनीने कोविड-१९ साथीच्या काळात कोविशिल्ड लस विकसित केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरसीबी संघाला विकत घेण्यास अदार पूनावाला यांनी रस दाखवला आहे. त्यांची कंपनी एकट्याने आरसीबीला खरेदी करण्यास इच्छुक आहेत.

आरसीबीची सध्याची किंमत ₹१७,७०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. सध्या डियाजिओ (Diageo) कंपनी आरसीबीची मालक आहे, परंतु कंपनी आरसीबीला आपला मुख्य व्यवसाय मानत नाही, त्यामुळे ते हा संघ विकण्यास इच्छुक आहे. Vaibhav Suryavanshi Century: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी; ९ चौकार आणि ८ षटकारांसह शतक

कोण आहेत अदार पूनावाला?

अदार पूनावाला हे जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनीचे प्रमुख आहेत. ते सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ आहेत. त्यांच्या कंपनीने कोविड-१९ साथीच्या काळात कोविशिल्ड ही महत्त्वपूर्ण लस विकसित केली होती. अदार पूनावाला हे एका पारशी कुटुंबातील असून, त्यांचे वडील सायरस पूनावाला यांनी १९६६ मध्ये SII ची स्थापना केली होती. घोडेबाजारातून आपला व्यवसाय सुरू करणाऱ्या सायरस पूनावाला यांच्याप्रमाणेच अदार यांनाही घोडेस्वारीची आवड आहे. गेल्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये १,४४६ कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी केल्याने ते चर्चेत आले होते.

अदार पूनावाला यांची एकूण संपत्ती किती?

अहवालांनुसार, पूनावाला यांच्याकडे पैशांची कमतरता नाही. त्यांची एकूण संपत्ती ₹१.१३ लाख कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे, इतकी मोठी रक्कम मोजून आयपीएल संघ खरेदी करणे त्यांच्यासाठी फार मोठे काम नाही. मात्र, अद्याप त्यांनी या विषयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.