Happy Dussehra Wishes In Marathi: दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यालाच विजयादशमी असेही म्हणतात. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे, कारण हा केवळ एक सण नसून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध करून माता सीतेला त्याच्या तावडीतून मुक्त केले होते. म्हणूनच, दसऱ्याच्या दिवशी रावणासोबतच त्याचे भाऊ कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. हा दिवस आपल्यातील अहंकार, वाईट विचार आणि चुकीच्या सवयींचा नाश करण्यासाठी प्रेरणा देतो. यंदा २ सप्टेंबर रोजी दसऱ्याचा सण साजरा होत आहे.

तुम्हीही या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा आपल्या मित्रमंडळी, कुटुंब आणि नातेवाईकांना देऊ शकता. यासाठी खालील Wishes, Greetings, Quotes, WhatsApp Status वापरून तुम्ही दसऱ्याच्या खास शुभेच्छा पाठवू शकता.

सदिच्छांची सुवर्णकिरणे पसरो तुमच्या आयुष्यात,

दसऱ्याचा हा मंगलक्षण नांदो अखंड दिवसात!

शुभमुहूर्ताचा हा उत्सव होवो लाभदायी,

सुख-समृद्धीचा पाऊस बरसो जीवनभर जिव्हाळ्याने!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

रावणरूपी अन्याय, अहंकार जाळू,

भेदभावाचा अंधार दूर सारू!

सुविचारांचे सोने लुटू,

विकास पथावर सिमोल्लंघन करू!

दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा!

तोरण सजवू दारी,

रांगोळी फुलवू अंगणी!

सोनेरी उत्सव उधळूनी,

बंध जपूया मनामनी!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सूर्यकिरणांनी उजळल्या दिशा,

आली नवी उमेद, नवी आशा!

पूर्ण होवोत प्रत्येक स्वप्न,

तुमच्या जीवनात नांदो सुख शांतीचा प्रवाह!

दसऱ्याच्या खुप शुभेच्छा!

सोन्याचा उत्सव आला,

घराघरांत सोनेरी झळाळा!

जीवन फुलो आनंदाने,

सुख समृद्धी लाभो सगळ्यांना!

दसऱ्याच्या सर्वांना खुप शुभेच्छा!

सीमा ओलांडून नवे ध्येय गाठू,

यशाचे शिखर सर करू!

प्रगतीची सुवर्णकिरणे वाटू,

आनंद सर्वांमध्ये फुलवू!!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमी साठी शुभ मुहूर्त

कॅलेंडरनुसार, या वर्षी, आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील (प्राणघातक) दशमी तिथी १ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७:०१ वाजता सुरू होईल आणि २ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७:१० पर्यंत चालेल. हिंदू मान्यतेनुसार, रावण दहन प्रदोष काळ (रावण दहनाचा काळ) दरम्यान होते. या दिवशी सूर्यास्त संध्याकाळी ६:०३ वाजता होईल. म्हणून, सूर्यास्त आणि दशमी तिथीच्या समाप्ती दरम्यान संध्याकाळी ७:१० वाजता रावण दहन करता येते. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी २:०९ ते दुपारी २:५६ पर्यंत असेल.