Happy Dussehra 2024 HD Images: हिंदू धर्मात दसरा (Dussehra 2024) हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी विजयाचा उत्साह साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो, असं म्हणतात. त्यामुळे लोक दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ कार्य करतात, जसे की सोने खरेदी, वाहन खरेदी, इत्यादी. आज सर्वत्र दसऱ्याचा म्हणजेच विजयादशमी (Vijayadashami 2024) चा सण साजरा होत आहे. या दिवशी घरातील सर्व मौल्यवान वस्तूची, वाहनांची आणि सरस्वती देवीची पूजा केली जाते.
दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील दसऱ्या निमित्त Wishes, Greetings, WhatsApp Status द्वारे तुमच्या मित्रांना तसेच नातेवाईकांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा पाठवू शकता. लेटेस्टली मराठीने दसऱ्यानिमित्त तुमच्यासाठी खास ग्रेंटिग्ज तयार केले असून तुम्ही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.
दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी माता दुर्गा देवीचे विसर्जन केले जाते. यंदा विजयादशमी शनिवारी असून या दिवशी देवी दुर्गा कोंबड्यावर बसून परतणार आहे. महाराष्ट्रात दसऱ्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. तसेच दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने देण्याचीही प्रथा आहे.