Happy Dussehra 2024 Messages In Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

Happy Dussehra 2024 Messages In Marathi: हिंदू धर्मात दसऱ्याच्या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. दसऱ्या (Dussehra 2024) च्या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा केली जाते. या दिवशी रामायण पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. वैदिक कॅलेंडरनुसार, यंदा 12 ऑक्टोबर रोजी दसरा म्हणजेचं विजयादशमी (Vijayadashami 2024)चा सण साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी भगवान रामासोबतच माँ दुर्गा, भगवान गणेश आणि हनुमानजींच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की दसऱ्याच्या दिवशी त्यांची पूजा केल्यास जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतात आणि यशाचा मार्ग खुला होतो. दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी रावण, कुंभकरण, मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते.

हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी लोक एकमेकांना खास दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील दसरा शुभेच्छा संदेश, विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा, दसरा मराठी संदेश, दसरा मराठी मेसेज, दसरा व्हॉट्सअॅप स्टेटस द्वारे आपल्या मित्र-परिवारास, नातेवाईकांस या दिवसाच्या खास शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रेंटिंग्ज डाऊनलोड करू शकता.

झाली असेल चूक तरी

या निमिनत्ताने आता ती विसरा

वाटून प्रेम एकमेकांस

साजरा करु यंदाचा हा दसरा!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Dussehra 2024 Messages In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा

केवळ सोन्यासारख्या लोकांना

हॅपी दसरा!

Happy Dussehra 2024 Messages In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)-

आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली

अश्विनातली विजयादशमी

दसऱ्याच्या आज शुभ दिनी

सुख नांदो तुमच्या जीवनी!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Dussehra 2024 Messages In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

रम्य सकाळी, किरण सोनेरी

सजली दारी तोरणे ही साजिरी,

उलगगे आनंद मनी,

जल्लोष हा विजयाचा हसरा रम्य उत्सव प्रेमाचा

तुम्हांस सुखसमृद्धी देवो हा दसरा!!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Dussehra 2024 Messages In Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

शांतता आणि सत्याच्या या देशात

आता वाईटाला संपवायचं आहे

दहशती रावणाचं दहन करून

पुन्हा श्रीराम राज्य आणायचं आहे

शुभ दसरा... शुभ विजयादशमी!

Happy Dussehra 2024 Messages In Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)

शारदीय नवरात्रीत दररोज दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जात आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी देवीचे विसर्जन करून विजयादशमी साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि श्रीरामाने लंकेत रावणाचा वध केला होता.