
NZ vs AUS 1st T2O Live Streaming: २०२६ च्या आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आजपासून चॅपेल-हॅडली ट्रॉफीमध्ये आमनेसामने येणार आहेत. तीन सामन्यांच्या या टी-२० मालिकेची सुरुवात माउंट माउंगानुई येथील बे ओव्हलमध्ये होणार आहे. अनेक प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत ही मालिका दोन्ही संघांना आपल्या बेंच स्ट्रेंथची चाचणी घेण्याची संधी देईल. न्यूझीलंडचे नियमित कर्णधार मिचेल सँटनर, विल ओ’रुर्के, ग्लेन फिलिप्स आणि फिन ॲलन दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाहीत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल आणि नुकताच निवृत्ती घेतलेला मिशेल स्टार्क यांच्याशिवाय खेळावे लागणार आहे.
Skippers assemble 🫡
The Chappell-Hadlee KFC T20I series begins on Wednesday at Bay Oval 🏆 #NZvAUS pic.twitter.com/lr4m1njdbu
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 28, 2025
NZ vs AUS: पहिल्या T20 सामन्याचे वेळापत्रक
- सामन्याची तारीख: बुधवार, १ ऑक्टोबर
- स्थळ: बे ओव्हल, माउंट माउंगानुई
- सामन्याची वेळ: भारतीय वेळेनुसार सकाळी ११:४५ वाजता
- नाणेफेकीची वेळ: भारतीय वेळेनुसार सकाळी ११:१५ वाजता
मॅच कुठे पाहता येईल?
ही संपूर्ण मालिका भारतात थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.
- टीव्हीवर: तुम्ही हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.
- लाइव्ह स्ट्रीमिंग: सोनी लिव्ह ॲपवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध नसेल. यासाठी तुम्हाला अमेझॉन प्राइम ॲप किंवा वेबसाइटवर लॉगइन करावे लागेल.
RCB विकली जाणार? १७,००० कोटींहून अधिक रकमेत ही मोठी खरेदी कोण करणार?
दोन्ही संघांचे स्क्वॉड
न्यूझीलंडचा स्क्वॉड: मायकल ब्रेसवेल (कर्णधार), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, बेवॉन जॅकब्स, काइल जेमीसन, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, बेन सिअर्स, टिम सेफर्ट आणि ईश सोढी
ऑस्ट्रेलियाचा स्क्वॉड: मिचेल मार्श (कर्णधार), सीन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, ॲलेक्स कॅरी, टीम डेव्हिड, बेन ड्वार्शुईस, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मॅट कुहनेमन, मिशेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि ॲडम झम्पा