
Dhammachakra Pravartan Din 2025: धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din 2024) हा दिवस भारतातील सामाजिक अन्याय आणि जातीय भेदभावाविरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वाचा क्षण आहे. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 2 ऑक्टोबर (आज) नागपूरच्या दीक्षाभूमी येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सण केवळ अध्यात्मिक प्रबोधनाचा उत्सवच नसून उपेक्षित समुदायांना, विशेषतः दलितांवर होत असलेल्या ऐतिहासिक अन्यायाविरुद्ध एक ऐतिहासिक दिवस आहे.
मित्र-मैत्रिणींना या खास दिवसाच्या शुभेच्छा द्या
धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त तुम्ही धम्म चक्र प्रवर्तन दिन शुभेच्छा, धम्म चक्र प्रवर्तन दिन प्रतिमा, धम्म चक्र प्रवर्तन दिन एसएमएस, धम्म चक्र प्रवर्तन दिन WhatsApp स्टेटस शेअर करून तुम्ही आपल्या बौद्ध मित्र-मैत्रिणींना या खास दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा !
समस्त बौद्ध धर्मियांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या
कोटी कोटी शुभेच्छा!
डॉ. आंबेडकरांचा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय त्यांच्या विविध धर्मांच्या विस्तृत अभ्यासामुळे प्रभावित झाला. समता आणि न्यायाला प्रोत्साहन देणाऱ्या नैतिक मूल्यांसाठी आणि शिकवणींसाठी त्यांनी शेवटी बौद्ध धर्माची निवड केली. धर्मांतरासाठी डॉ. बाबासाहेबांनी विजयादशमीचा दिवस निवडला. कारण, हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा सण आहे.