Niranjan Bhakre Dies of COVID-19: जेष्ठ लोककलावंत, भारूडकार निरंजन भाकरे यांचे आज करोनाने निधन
Niranjan Bhakre (Photo Credit: Twitter)

Niranjan Bhakre Passes Away: जेष्ठ लोककलावंत, भारूडकार निरंजन भाकरे (Niranjan Bhakre) यांचे आज कोरोनाने (Coronavirus) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. ज्यामुळे मागील काही दिवसांपासून एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची मालवली आहे. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

निरंजन भाकरे यांचा जन्म 10 जून 1965 साली औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद नावाच्या छोट्याशा गावात झाला. भजन व भारुडाचा वारसा वडीलांकडून मिळाला होता. वडीलांचे छत्र लवकर गेल्यामुळे भाकरे यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. लोककलेचे अभ्यासक अशोक परांजपे यांच्या संपर्कात आल्यानंतर भाकरे यांना ‘सोंगी भारुड’ सादरीकरणाची संधी मिळाली. काही वर्षांतच भाकरे नावारुपाला आले. त्यानंतर त्यांनी देश-विदेशात कार्यक्रम केले. मात्र,‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ या भारुड सादरीकरणाने त्यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली होती. हे देखील वाचा- 'गोकुळधामची दुनियादारी' आता युट्यूब चॅनेलवरही उपलब्ध, मालिकेला काही दिवसांतच मिळाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

ट्वीट-

लोककलांचे जतन, संवर्धन व्हावे म्हणून धडपड करणे हा त्यांचा स्थायीभाव होता. पण सपत्निक देहदानाचा संकल्प करणारे भाकरे हे पहिले लोककलावंत होते. कला आणि माणुसकीप्रती अविचल निष्ठा जपणारा हा कलावंत खऱ्या अर्थाने भारूड लोककला परंपरेचे वैभव ठरला आहे. त्यांच्या निधानावर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्ती केली जात आहे.