'गोकुळधामची दुनियादारी' आता युट्यूब चॅनेलवरही उपलब्ध, मालिकेला काही दिवसांतच मिळाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
Gokuldhamchi Duniyadari (Photo Credits: File)

नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय शो तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) आता त्यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर मराठीमध्ये ‘गोकुळधामची दुनियादारी’ (Gokuldhamchi Duniyadari) आणि तेलुगूमध्ये ‘तारक मामा अय्यो रामा’ आपल्या सर्वांच्या भेटीला आला आहे. गुढीपाडवा आणि उगादीच्या पवित्र मुहुर्तावर शुभारंभ झालेल्या या एपिसोडला काही तासातच युट्युब चॅनेलवर प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. दरम्यान कार्यक्रमाच्या युट्युब सबस्क्रायबरची संख्या 70 लाखापेक्षा जास्त झाली आहे आणि वाढत्या प्रेक्षक संख्येमुळे चॅनेल लवकरच कार्यक्रमातील गेल्या 12 वर्षातील काही उत्तम क्षण या चॅनेलवर अपलोड करणार आहे.

या कार्यक्रमाची ॲनिमेटेड सिरीज तारक मेहता का छोटा चष्मा (TMKCC) चे प्रक्षेपण 19 एप्रिलपासून Sony Yay चॅनेलवर सुरू झाले आहे. यामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा हा एकमेव भारतीय शो असेल जो एकाचवेळी लाइव्ह ॲक्शन, ॲनिमेशन आणि दोन प्रादेशिक भाषांमध्ये एकाचवेळी सुरू आहे. येत्या काही महिन्यात नीला फिल्म प्रोडक्शन्स आणखी एका प्रादेशिक भाषेत हा कार्यक्रम सादर करणार आहे.हेदेखील वाचा- खुशखबर! लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता मराठीमध्ये; Gokuldhamchi Duniyadari चा प्रोमो प्रदर्शित (Video)

तारक मेहता का उल्टा चष्मा हा जगातील सर्वाधिक काळ दररोज प्रक्षेपित होणारा कॉमेडी शो ठरला असून यातील बहुतांश कलाकारांची नावे भारतात आणि इतर अनेक देशात घरोघरी पोहचली आहेत. 2008 मध्ये पहिल्यांदा प्रक्षेपित झालेला तारक मेहता का उल्टा चष्मा आज 13 व्या वर्षातही सुरू आहे आणि या कालावधीत त्याचे 3,100 हून अधिक एपिसोड प्रसारित झाले आहेत.

'गोकुलधामची दुनियादारी' हे मूळ शोचे डब व्हर्जन असणार आहे. 24 डिसेंबरपासून, सोमवार ते शनिवार रोज रात्री 9 वा. या मालिकेचे प्रसारण सुरु आहे. 'गोकुळधाम सोसायटी’ ही 4 विंग असलेली, गोरेगाव पूर्व, मुंबईच्या पावडर गल्लीतील एक काल्पनिक निवासी संस्था आहे. हा शो मुख्यत: इथे राहणाऱ्या कुटुंबाभोवती फिरत राहतो. जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, भिडे मास्तर, डॉ हाथी, रोशनसिंग सोढी, पत्रकर पोपटलाल आणि टप्पू सेना अशा भूमिका या शोमुळे लोकप्रिय ठरल्या आहेत.