Photo Credit- X

Ranveer Allahbadia Controversy: समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' (India’s Got Latent) शोमध्ये अश्लील टिप्पण्या केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाला (Ranveer Allahabadia)दिलासा होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा पासपोर्ट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अटींसह पासपोर्ट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, अलाहाबादियाविरुद्धची चौकशी पूर्ण झाली आहे. मात्र, त्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा हजर राहावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबादियाला महाराष्ट्र सायबर सेलकडून पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी देखील दिली आहे.

1 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया याची पासपोर्ट परत करण्याची याचिका फेटाळली होती. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने रणवीर इलाहाबादिया याला नैतिकतेचे मानक राखण्याच्या अटीवर पॉडकास्ट पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने रणवीर इलाहाबादिया यांना अटकेपासून सुटका देऊन पॉडकास्ट करण्याची परवानगी दिली.

दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, रणवीर इलाहाबादिया यांने चाहत्यांची माफी मागत नवा व्हिडीओ शेअर केला होता. रणवीर म्हणाले की, तो आता अधिक जबाबदारीने कंटेंट तयार करेल. रणवीरने सांगितले की हा काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. परंतु मित्रांकडून मिळालेल्या सकारात्मकतेमुळे आणि प्रियजनांच्या पाठिंब्याने त्याला मदत केली. पुढे तो म्हणाला, "आयुष्याच्या सर्वात वाईट क्षणांमध्येच तुम्हाला हे जाणवते की तुम्ही केवळ यशस्वी नसाल, तर तुम्हाला अपयशाचाही सामना करावा लागेल."