
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका (Assamese Singer) गायत्री हजारिका (Gayatri Hazarika) यांचे शुक्रवारी वयाच्या 44 व्या वर्षी गुवाहाटी, आसाम येथील नेमकेअर रुग्णालयात निधन झाले. त्या कोलन कर्करोगाने ग्रस्त होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने संगीत उद्योगात शोककळा पसरली आहे. 'झोरा पाते पाते फागुन नामे' या गाण्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली. गायत्रीने 'तुमी कुन बिरोही अनन्या', 'जंक नसील बोनोट', 'झेउजी झोपोन' आणि इतर गाण्यांनाही आवाज दिला. अनेक प्रमुख व्यक्ती आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर गायत्री हजारिका यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी प्रसिद्ध गायिका गायत्री हजारिका यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. CMOfficeAssam च्या X हँडलवरील अधिकृत ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'HCM डॉ. @himantabiswa यांनी प्रसिद्ध गायिका श्रीमती गायत्री हजारिका यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांचा भावपूर्ण आवाज आणि आसामी संगीतातील त्यांचे अतुल्य योगदान नेहमीच लक्षात राहील. HCM ने त्यांच्या चिरंतन शांतीसाठी प्रार्थना केली असून त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केल्या.'
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक -
HCM Dr. @himantabiswa has expressed deep sorrow over the demise of renowned singer Smt. Gayatri Hazarika.
Her soulful voice and enduring contributions to Assamese music will always be remembered. HCM prayed for her eternal peace and extended heartfelt condolences to her bereaved… pic.twitter.com/1yGLb879gS
— Chief Minister Assam (@CMOfficeAssam) May 16, 2025
अतुल बोरा यांनी त्यांच्या X हँडलवर शोक व्यक्त केला -
"সৰা পাতে পাতে ফাগুন নামে..."
Deeply saddened by the untimely demise of Gayatri Hazarika. Her soulful voice enriched Assamese music and touched countless hearts. A great loss. Heartfelt condolences to her family and fans. Om Shanti!
জনপ্ৰিয় কণ্ঠশিল্পী গায়ত্ৰী হাজৰিকাৰ আকস্মিক… pic.twitter.com/wlbx82jfnp
— Atul Bora (@ATULBORA2) May 16, 2025
दरम्यान, आसाम गण परिषदेचे (AGP) अध्यक्ष अतुल बोरा यांनीही त्यांच्या X हँडलवर शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटलं आहे की, 'गायत्री हजारिका यांच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले. त्यांच्या भावपूर्ण आवाजाने आसामी संगीत समृद्ध केले आणि असंख्य हृदयांना स्पर्श केला. हे मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मनापासून संवेदना. ओम शांती!'