Pawandeep Rajan (Photo Credits: Instagram)

इंडियन आयडल सीझन 12 चा विजेता Pawandeep Rajan चा अहमदाबाद मध्ये गंभीर अपघात झाला आहे. ही घटना सोमवारी पहाटे 3.40 च्या सुमारास घडली आहे. पवनदीप या अपघातामध्ये जबर जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पवनदीपचे हॉस्पिटलमधील जखमी अवस्थेमधील फोटोज, व्हिडिओज सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल झाले आहेत. पवनदीपच्या हाता-पायाला दुखापत झाली आहे.

पवनदीप हा मूळचा उत्तराखंड मधील आहे.2021 साली झालेल्या इंडियन आयडॉल या म्युझिक रिअ‍ॅलिटी शो चा तो विजेता आहे. इंडियन आयडॉल कार्यक्रमामधून तो घराघरामध्ये पोहचला आहे. 2015 साली त्याने व्हॉईस ऑफ इंडिया हा रिअ‍ॅलिटी शो देखील जिंकला होता. नक्की वाचा: Bus Overturns at Karnala Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा घाटात बस उलटली; 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी.  

पवनदीपच्या अपघातानंतर सोशल मीडीयात व्हिडीओ वायरल

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनीही पवनदीप साठी प्रार्थना

अद्याप, पवनदीप किंवा त्यांच्या टीम कडून कोणीही अपघाताबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. अपघातामागील नेमकी परिस्थिती समजू शकलेली नाही. गाडीत त्याच्यासोबत कोण होतं? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि येत्या काही तासांत अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. या अपघाताच्या काही दिवस आधी म्हणजे 27 एप्रिललाच त्याचा वाढदिवस झाला आहे.