
BAN vs UAE Asia Cup 2025: आशिया कप 2025 मधील तिसरा सामना आज, गुरुवार, 11 सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात अबूधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर होणार आहे. हाँगकाँगला त्यांच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानकडून 94 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे आता या सामन्यात त्यांच्यावर दमदार पुनरागमनाचा दबाव असेल. अफगाणिस्तानकडून सदीकुल्लाह अटल आणि अजमतुल्लाह उमरजई यांनी शानदार अर्धशतके झळकावत 188 धावांचा डोंगर उभारला होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना हाँगकाँगचा डाव 94/9 पर्यंत मर्यादित राहिला. मागील पराभवानंतरही हाँगकाँगचा कर्णधार यासिम मुर्तजा आपल्या संघाकडून बांगलादेशविरुद्ध चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहे. बांगलादेशचे नेतृत्व लिटन दास करत आहेत.
BAN vs HK सामन्याची Live माहिती
कधी खेळला जाणार बांगलादेश विरुद्ध हाँगकाँगचा सामना?
हा सामना 11 सप्टेंबर 2025 रोजी खेळला जाणार आहे.
किती वाजता सुरू होणार BAN vs HK चा सामना?
हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल, तर यूएईच्या स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सुरू होईल.
कुठे खेळला जाईल हा सामना?
हाँगकाँग विरुद्ध बांगलादेशचा सामना अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर होणार आहे.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहणार?
- ऑनलाइन: सोनी लिव (Sony LIV) ॲप आणि वेबसाइटवर पाहता येईल.
- टीव्हीवर: सोनी स्पोर्ट्स 1 आणि सोनी स्पोर्ट्स 5 (इंग्रजी), सोनी स्पोर्ट्स 3 (हिंदी) आणि सोनी स्पोर्ट्स 4 (तमिळ/तेलुगु) या चॅनेलवर पाहता येईल.
BAN vs HK हेड-टू-हेड रेकॉर्ड
- एकूण सामने: 1
- हांगकाँगने जिंकले: 1
- बांगलादेशने जिंकले: 0
टी-20 फॉरमॅटमध्ये बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात केवळ एकदाच लढत झाली आहे. ही लढत 2014 च्या टी-20 विश्वचषकात झाली होती, ज्यात हाँगकाँगने 2 गडी आणि 2 चेंडू राखून विजय मिळवला होता.