
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अबू धाबीचे (Abu Dhabi) क्राउन प्रिन्स आणि UAE सशस्त्र दलांचे उप सर्वोच्च कमांडर शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (Sheikh Mohamed bin Zayed al Nahyan) आज डिजिटल माध्यमातून शिखर बैठक घेणार आहेत. यामध्ये दोन्ही देशांदरम्यान संयुक्त आर्थिक आघाडी करार (CEPA) होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, "या बैठकीत दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा करतील तसेच समान हितसंबंधांशी संबंधित प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील." आणि मैत्रीपूर्ण संबंधांबद्दलचे त्यांचे दृष्टीकोन मांडतील.
Tweet
PM Modi and Crown Prince of Abu Dhabi Sheikh Mohamed bin Zayed al Nahyan will hold a virtual summit today. The two leaders will also discuss bilateral cooperation and exchange views on regional and international issues of mutual interest: MEA
(File photo) pic.twitter.com/TenL9d60o8
— ANI (@ANI) February 18, 2022
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे संयुक्त आर्थिक आघाडी करार (CEPA) आहे. CEPA साठी वाटाघाटी सप्टेंबर 2021 मध्ये सुरू झाल्या आणि पूर्ण झाल्या आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा करार भारत-यूएई आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांना पुढील स्तरावर नेईल. या घडामोडीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, शिखर परिषदेदरम्यान भारत आणि UAE द्वारे CEPA वर स्वाक्षरी केली जाईल. (हे ही वाचा
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही शिखर परिषद अशा वेळी होणार आहे जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करण्यासाठी अमृत महोत्सव साजरा करत आहे, तर संयुक्त अरब अमिराती (UAE) त्याच्या स्थापनेचा 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. भारत आणि UAE मधील द्विपक्षीय संबंध अलिकडच्या वर्षांत सर्व क्षेत्रांमध्ये मजबूत झाले आहेत आणि दोन्ही बाजूंनी सर्वसमावेशक धोरणात्मक युती तयार केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी 2015, 2018 आणि 2019 मध्ये UAE ला भेट दिली तर अबु धाबीचे क्राऊन प्रिन्स 2016 आणि 2017 मध्ये भारताला भेट दिली.