Tulsi Vivah | File Image

Tulsi Che Mangalashtak: तुळशी विवाह (Tulsi Vivah 2025) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि शुभ सोहळा आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी हा विवाह घरी किंवा मंदिरात केला जातो. या दिवशी तुळशीच्या रोपाला नववधूप्रमाणे सजवले जाते आणि भगवान विष्णूच्या प्रतीक शाळीग्रामसोबत तिचा लग्न विधी केला जातो. महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी तुळशी विवाह उत्साहात साजरा होतो. या दिवशी घरातील सर्वजण एकत्र येतात आणि प्रेम, सौहार्द, एकोपा वृद्धिंगत करण्याचा संकल्प करतात.

पौराणिक कथेनुसार तुळशी ही देवी लक्ष्मीचे रूप मानली जाते. जलंधर या असुराची पत्नी वृंदा ही तुळशीचे पूर्वजन्मातील स्वरूप होते. तिच्या सतित्वामुळे जलंधर अपराजेय बनला होता. भगवान विष्णूंनी तिच्या भक्तीवर खुश होऊन, तिच्या मृत्यूनंतर तिचे रूप तुळशीच्या पवित्र वनस्पतीत परिवर्तित केल्याचे मानले जाते. विष्णूंनी शाळीग्राम रूपात तुळशीशी विवाह करून आपले वचन पूर्ण केले.

तुळशी विवाह मंगलाष्टकाचे महत्त्व

लग्नसोहळ्याचे मंगळमय वातावरण निर्माण करण्यासाठी आणि शुभ संकल्प सिद्धीस नेण्यासाठी मंगलाष्टक म्हटले जाते. तुळशी विवाहाच्या वेळी मंगलाष्टक गायल्यानं पवित्रता, समृद्धी, आणि घरात चैतन्य निर्माण होतं, असे मानले जाते. या मंगलाष्टकांमध्ये गणेश, देवी, विष्णु, जेष्ठ बंधू आणि समाजातील मोठ्‍यांचे स्मरण केले जाते, ज्यामुळे योग्य आशीर्वाद मिळतात.

तुळशीच्या लग्नासाठी मंगलाष्टकं   (Tulsi Vivah Mangalashtak In Marathi Text)

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।

बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।

लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।

ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।

गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वति वेदीका ।

शिप्रा वेञवती महासूर नदी,ख्याता गया गंडकी।

पुर्णा पुर्ण जलै, समुद्र सरीता।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।२।।

लक्ष्मी कैस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरीश्वचंद्रमा।

गाव कामदुधा सरेश्वर गजो, रंभादिदेवांगना ।

अश्क सप्त मखो विषम हरिधनु शंखो मृतम चांबुधे ।

रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनम,कुर्वतु वो मंगलम।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।३।।

रामो राजमणी सदा विजयते रामम्।

रमेशम भजे रामेणाभिहता निशाचरचमु।

रामाय तस्मै नमः।

रामान्नस्ति परायणम् परतम् रामस्य दासोराम्यहम् ।

रामे चित्तलय सद भवतु मे भी राम मामुघ्दर।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।४।।

राणा भिमक रुक्मीणीस नयनी, देखोनी चिंता करी ।

हि कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासी म्या दिईजे।

आता एक विचार कृष्ण नवरा ,त्यासी समर्पु म्हणे।

रुख्मी पुञ वडील त्यासी पुसणे ।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।५।।

लाभो संतती संपदा बहु तुम्हा,लाभोतही सद्रुण ।

साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवा भूषण।

सारे राष्ट्रधुरिण हेचि कथिती किर्ति करा उज्वल।

गा ग्रहास्याश्रम हा तुम्हा वधूवरा देवो सदा मंगलम् ।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।६।।

विष्णूला फमला शिवसी गिरीजा, कृष्णा जशी रुक्मिणी।

सिंधुला सरिता तरुसि लतिका,चंद्रा जशी रोहिणी ।

रामासी जनकात्मजा प्रिया जशी, सवित्री सत्यवरता ।

तैशि ही वधु सजिरी वरीतसे, हर्ष वरासी आता।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।७।।

आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।

गृहतके मधुपर्क पुजन करा अन्त पाटते धरा।

दृष्टादृष्ट वद्य वरा न करिता , दोघे करावी उभी।

वाजंञे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम।

कुर्या सदा मंगलम शुछ मंगल सावधान।।८।।

या उत्सवाच्या निमित्ताने घरातील वातावरण मंगलमय होते. सर्वजण प्रेमाने एकत्र येतात, शुभाशीर्वाद मिळवतात आणि भारतीय संस्कृतीतील स्त्रीचे व वनस्पतीचे पूजन महत्त्व अधोरेखित करतात.