Idiot सर्च केल्यावर का दाखवला जातो Donald Trump यांचा फोटो, Sundar Pichai यांनी दिले स्पष्टीकरण

गूगलचे जगातील स्पर्धात्मक प्रभुत्त्व, चीनमधील सेन्सॉरशीप आणि गोपनीयतेच्या नियमांवर संदर पिचाई यांनी हाऊस कमिटी ऑन द ज्युडिशिअरी ( House Judiciary Committee) समितीसमोर आपली बाजू मांडत असताना उत्तरं दिली.

Idiot सर्च केल्यावर का दाखवला जातो Donald Trump यांचा फोटो, Sundar Pichai यांनी दिले स्पष्टीकरण
CEO of Google Sundar Pichai (Photo Credits: ANI)

आज जगभरात निवडणूक प्रचारांमध्ये डिजिटल मीडिया प्रभावी ठरत आहे. फेसबूक(Facebook) पाठोपाठ गूगल (Google) देखील पक्षपाती असल्याचे आरोप करण्यात आले होते. मंगळवारी या प्रकरणी गूगलचे जगातील स्पर्धात्मक प्रभुत्त्व, चीनमधील सेन्सॉरशीप आणि गोपनीयतेच्या नियमांवर सुंदर पिचाई  यांनी हाऊस कमिटी ऑन द ज्युडिशिअरी ( House Judiciary Committee) समितीसमोर आपली बाजू मांडत असताना उत्तरं दिली. समितीसमोर बोलताना रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांना गुगल एखाद्या राजकीय पक्षाला झुकते माप देते का? असा प्र्श्न विचारण्यात आला होता. त्यावेळेस पिचाई यांनी गूगल कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन करत नसल्याचं उत्तर दिले आहे.

Idiot च्या सर्च रिझल्टसमोर डोनाल्ड ट्रम्पचा फोटो का ?

झो लोफग्रेन (Zoe Lofgren)  यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भातील तसेच गुगल सर्च कसे काम करते या विषयी प्रश्न विचारला. काही दिवसांपूर्वी Idiot या शब्दाच्या सर्च रिझल्टमध्ये फोटो इमेज रिझल्टमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांचा फोटो दिसत होता. हा प्रकार काय होता यावर सुंदर पिचाई यांनी स्प्ष्टीकरण दिले आहे.

सुंदर पिचाईंनी दिलेल्या उत्तरानुसार, गूगल सर्चमध्ये एखादा शब्द सर्च केल्यानंतर तो Real Time मध्ये उपलब्ध माहितीच्या आधारे सर्च केला जातो. यामध्ये एखाद्या शब्दाच्या संदर्भात अनेक वेब पेजेस साठवून ठेवलेली असतात. जेव्हा आपण एखादा शब्द सर्च करतो तेव्हा त्या शब्दाचं महत्त्व, त्याची चर्चा लोकप्रियता, इंटरनेटवरील युजर्स तो शब्द कसा वापरतात याचा विचार करून सर्च रिझल्ट दाखवले जातात. यामध्ये गूगल कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतर सामान्य व्यक्तींकडूनही गूगल सर्च रिझल्टवर शिक्कामोर्तब केले जाते.

रोज गूगलवर सर्च होणाऱ्या गोष्टींपैकी 15 टक्के गोष्टी या गुगलसाठीच नव्या असतात. यापूर्वी गूगलवर सर्च न झालेल्या गोष्टींवर गूगलही काम करत असते. या गोष्टींवर तांत्रिक स्तरावर काम होते. गूगलवरील सारेच सर्च रिझल्ट कंपनीकडून दाखवलेले नसातात असे उत्तर पिचाई यांनी दिले

गूगल सर्च रिझल्टमध्ये डेमोक्रॅटिक्स पक्षाच्या बाजूची माहिती अधिक दाखवतात असा आरोप करण्यात आला होता. गूगल मुद्दामूनच उदारमतवादी विचारसरणीच्या बेवसाईटला अधिक वरचे स्थान देते असे समितीच्या सदस्याचे म्हणणे आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2018 12:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).