Nobel Prize 2019 Economics Winners: भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी (Abhijit Banarjee) यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार (Nobel Prize For Economics) जाहीर झाला आहे. ईस्टर डूफलो (Esther Duflo )आणि मायकल क्रेमर (Michael Kremer) यांच्यासहित बॅनर्जी यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार प्राप्त झाला आहे

Nobel Prize 2019 Economics Winners: भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर
Abhijit Banerjee, Esther Duflo and Mechel Kremer | (Photo Credits: Twitter/NobelPrize)

भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी (Abhijit Banarjee)  यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार (Nobel Prize For Economics) जाहीर झाला आहे. ईस्टर डूफलो (Esther Duflo )आणि मायकल क्रेमर (Michael Kremer) यांच्यासहित बॅनर्जी यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जागतिक गरिबी हटवण्या करिता प्रायोगिक दृष्टिकोन अवलंबण्याच्या त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे, आज नोबेल पुरस्कार घोषणेतील हा अंतिम निकाल होता. यापूर्वी भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना देखील नोबल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. यासोबतच 58 वर्षीय बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार मिळवलेल्या भारतीयांच्या यादीत सहाव्या स्थानी बसण्याचा मान मिळाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बॅनर्जी यांनी कोलकत्ता विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ मध्ये शिक्षण घेतले होते. तसेच 1988 मध्ये त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधून पीएचडी प्राप्त केली. तूर्तास ते संशोधनासोबतच Massachusetts इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. 2003 मध्ये बॅनर्जी यांनी ईस्टर डूफलो आणि सेंधील मुलैयानाथन यांच्यासोबत अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी ऍक्शन लॅबची ( (J-PAL) स्थापना केली.

 

पहा ट्विट

Nobel Prize 2019 Physiology And Medicine Winner: कॅन्सर ,ऍनिमिया वरील औषधांशी संबंधित शोधासाठी William G Kaelin Jr, Sir Peter J Ratcliffe , Gregg L Semenza यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान

दरम्यान, बॅनर्जी व अन्य दोन विजेत्या अर्थशास्त्रज्ञांच्या यंदाच्या शोधामुळे जागतिक स्तरावर दारिद्र हटवणाऱ्या योजना राबविण्यामध्ये मदत होणार आहे. तसेच या प्रायोगिक दृष्टिकोनातून अर्थशास्त्र विकासाला व या विषयातील संशोधनाला चालना मिळणार आहे, असे मत नोबेल पारितोषिक कमिटी मधील परीक्षकांनी मांडले आहे. बॅनर्जी यांना मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप हे प्रतिवर्षीप्रमाणे साडे चार कोटी रुपये रोख तसेच 23 कॅरेट सोन्याचे 200 ग्रॅमचे पदक आणि प्रशस्तीपत्रक असे आहे. पदक म्हणून नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांचा फोटो असलेले सोन्याचे पदक दिले जाते.

(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2019 04:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).