Indian women's cricket team makes history by winning the World Cup (Photo: ICC)

ICC Women's World Cup 2025: रविवारच्या रात्री मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर भारताच्या विश्वविजयाची (ICC Women World Cup 2025) नोंद झाली. मायदेशात प्रोटीयांना (दक्षिण आफ्रिका) हरवून 'विमेन्स इन ब्लू'ने (CWC Champion India) सुवर्ण ट्रॉफी आपल्या नावे केली. यासोबतच हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना यांनी इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरले.

२०१७ मध्ये अगदी जवळ पोहोचूनही लक्ष्य गाठता आले नव्हते. इंग्लंडकडून हरल्यानंतर विश्वविजेते होण्याचे स्वप्न डोळ्यासमोर भंग झाले होते. ते स्वप्न २०२५ मध्ये पूर्ण झाले! ऋचा घोष, शेफाली वर्मा यांच्या प्रयत्नातून वर्ल्ड कप देशात आला. भारतीय मुलींच्या या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्रमंडळी आणि प्रियजनांसोबत हे शुभेच्छा संदेश नक्की शेअर करा:

विश्वविजेता भारत!

जय-जयकार आणि उत्साहामध्ये टीम इंडिया!

मायदेशात 'विमेन्स इन ब्लू'च्या हातात ट्रॉफी!

टीम इंडियाला खुप खुप शुभेच्छा!

दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात पराभूत

टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ७ विकेट्स गमावून २९८ धावा केल्या. शेफाली वर्माने संघासाठी शानदार खेळी केली आणि फक्त ७८ चेंडूत ८७ धावा केल्या. दीप्ती शर्माने ५८ धावा केल्या, तर स्मृती मानधनाने ४५ धावा केल्या. २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांतच संपुष्टात आला.